देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मूळ शिवसेना टिकावी म्हणून प्रवेशाचा निर्णय

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
in परभणी
0
मूळ शिवसेना टिकावी म्हणून प्रवेशाचा निर्णय
Please Share

खासदार संजय जाधव यांची स्पष्टोक्ती, सेलूतील मेळाव्यात शिवसैनिकांशी साधला मनमोकळा संवाद

सेलू जि.परभणी : वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली मूळ शिवसेना जिल्ह्यात खऱ्या अर्थाने टिकावी, संघटना मजबूत व्हावी यासाठी‌ कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जड अंतःकरणाने पक्षप्रवेश करावा लागला आहे, असे स्पष्ट प्रतिपादन खासदार संजय जाधव यांनी केले. माजी आमदार हरिभाऊ लहाने आणि तालुकाप्रमुख तथा नगरपालिकतेतील गटनेते संदीप लहाने यांच्या पुढाकाराने शुक्रवारी, ३ जुलै २०२६ रोजी आयोजित शिवसैनिकांच्या संवाद मेळाव्यात सत्कारप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. पुढील काळात सर्वांनी संघटित राहून संघर्ष करण्याची गरज असून, बाळासाहेबांनी लावलेले हे शिवसेनेचे रोपटे अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने मनापासून प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

याप्रसंगी माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, राजू कापसे, भास्कर लंगोटे, विनायकराव खंडागळे, नगरसेवक डॉ.अनिकेत जोगदंड, अनुपमा देवधर, सपना काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात खासदार जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार जाधव पुढे म्हणाले, ” मी पूर्वीपासून शिवसेनेचाच असून आजही त्याच विचारांशी बांधील आहे. शिवसेनाप्रमुखांनी दिलेला सामाजिक बांधिलकीचा विचार घेऊनच शिवसैनिक काम करतात. मात्र, गेल्या काही काळात पक्षाची ध्येयधोरणे बदलल्यामुळे आणि कामे होत नसल्याने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जड अंतःकरणाने मला पक्षप्रवेशाचा निर्णय घ्यावा लागला,” अशीही मनमोकळी भूमिका खासदार जाधव यांनी मांडली. भविष्यात जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमतरता भासणार अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात १९८६ चा शिवसेनेचा झंझावात दिसून येत असल्याचे प्रास्ताविकात संदीप लहाने यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोपात माजी आमदार लहाने म्हणाले, की शिवसैनिक लढण्यास तयार आहेत. आता खासदार जाधव यांच्या रूपाने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा जिल्ह्याला नेता मिळाला आहे. शिवसेनाप्रमुखांचे ज्वलंत विचार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने समोर येत आहे. शिवसेनेचे तत्व स्वीकारून कोणी पक्ष प्रवेश करत असेल, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, शिवसेना-भाजपची सत्ता आल्यानंतर शिवसैनिकांना पाहिजे तो मान सन्मान मिळत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक डॉ.अनिकेत जोगदंड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा मिळावी यासाठी फिरते रुग्णालयाच्या फलकाचे उदघाटन यावेळी खासदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, तसेच महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले, तर रामेश्वर बहिरट यांनी आभार मानले.

Post Views: 1,606
Please Share
Previous Post

ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे २२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

Next Post

धन्वंतरी ज्ञानाई वारकरी दिंडीचे प्रस्थान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
धन्वंतरी ज्ञानाई वारकरी दिंडीचे प्रस्थान

धन्वंतरी ज्ञानाई वारकरी दिंडीचे प्रस्थान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

धनंजय चौधरी जिल्ह्यात १२ वा, तर मधुर कुलकर्णी २१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण; गुणवंतांचे सर्व स्तरांतून कौतुक सेलू/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा...

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

सेलू : भारतीय जनता पार्टी सेलू युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी नागेश गणेशसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर...

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

कृषी महाविद्यालय सेलूच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; प्रभात फेरी आणि वृक्षारोपणाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष केमापूर : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या...

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा कृषी दिनानिमित्त उपक्रम कुंडी (ता. सेलू) : सेलू येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयातर्फे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ