देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

हेलसच्या गणेशात्सवात जपली जाते नाट्य परंपरा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 3, 2025
in मराठवाडा
0
हेलसच्या गणेशात्सवात जपली जाते नाट्य परंपरा
Please Share

श्री गणेश नाट्य मंडळातील हौशी कलावंतांचा सहभाग, सामाजिक विषयावर होते प्रबोधन

मंठा : श्रीगणेशोत्सवानिमित्त मंठा तालुक्यातील हेलस येथे मनोरंजनासोबत समाज प्रबोधनपर नाट्य प्रयोग सादरीकरणाची शेकडो वर्षांची नाट्य परंपरा जेष्ठ कलाकारांच्या मार्गदर्शनात तरूण हौशी कलावंतांकडून आजही जपली जात आहे. या वर्षी बुधवार व गुरूवार ( ता.३ व ता.४ सप्टेंबर) नाट्य प्रयोग सादर होणार आहेत. अध्यक्ष दीपक खराबे, विश्वनाथ संत आणि भारतनाना खराबे यांनी ही माहिती दिली. ग्रामदैवत श्री गणेश मंदिर संस्थान च्या वतीने आयोजित गणेशोत्सवाचे हे १३४ वे वर्ष आहे. श्री योगेश महाराज कुलकर्णी यांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत कथेला सोमवारी सुरवात झाली, श्री ज्ञानेश्वरी पारायण, विश्वनाथ खराबे यांच्या नेतृत्वाखाली हरिपाठ, भजन, गवळण, भारूड, हरिजागर आदी कार्यक्रम होत आहेत. पौर्णिमेला ‘श्रीं’ चा पालखी मिरवणूक सोहळा पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आणि आकर्षण ठरत आलेला आहे. दरवर्षी ७० ते ८० गावांच्या भजनकरी दिंड्या सहभागी होतात.

नाटकांसोबतच लळितमध्ये विविध सोंग सादर करून समाजातील अनिष्ट रूढी परंपरावर प्रकाश टाकला जातो. सामाजिक विषयांवर विडंबनात्मक सादरीकरणातून जनजागृती केली जाते. या वर्षी बुधवार, ३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता ” हा स्पर्श मायेचा” हा सामाजिक आणि कौटुंबिक नाट्य प्रयोग, तर गुरुवारी ” पुढारी दोन- खुनी कोण? ” हा सामाजिक वग नाट्य प्रयोग सादर होणार आहे. यामध्ये गावातील तरूण कलाकारांचा सहभाग असून दिग्दर्शन गणेश उद्धव खराबे करीत आहेत.- भारतनाना खराबे, नाट्य कलावंत, श्री गणेश नाट्य मंडळ, हेलस

या उत्सवाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे श्री गणेश नाट्य मंडळ हेलसच्या वतीने तीन अंकी नाट्यप्रयोग सादर केले जातात. त्रिमूर्ती गायनाने सुरूवात होते. आजपर्यंत राम गणेश गडकरी यांचे “एकच प्याला” सह झाशीची राणी, भगवा झेंडा, मोहित्यांची मंजुळा, सखू आली पंढरपुरा, सरपंच खुनी, पाटील बेईमानी, राजा हरिश्चंद्र, सिंहाचा छावा, गोकुळचा चोर आदी अनेक नाटके सादर करण्यात आली आहेत. दिवंगत दगडप्पा साखरे, खंडेराव कुलकर्णी, रंगराव कुलकर्णी, विश्वनाथ चेअरमन, भगवानराव कुलकर्णी, रावसाहेब पाराजी, किसनराव पाटील, हरिभाऊ टेलर, रामेश्वर उद्धवराव, विठ्ठल आणेभाऊ, काशीनाथ हरिभाऊ, रुस्तुम दुकानदार, पुंजाराम सहदेव तसेच जेष्ठ नाट्य कलावंत साहेबराव गुरूजी, शंकरराव हेलसकर आदींसह अनेकांनी या व्यासपीठावर कला सादर करून नाट्य परंपरा जोपासली आहे. आता ही नाट्य परंपरा तरुण पिढी जोपासत असून हौशी कलावंत बालासाहेब खराबे, कैलास खराबे, गणेश खराबे, नामदेव खेत्रे बजरंग खराबे, माऊली खराबे आदींसह अनेक तरुण मोठ्या उत्साहाने नाट्यप्रयोगात सहभागी हतात. महिलांची भूमिका आजही पुरुषच करतात हे विशेष.

श्री गणेश नाट्य मंडळाच्या वतीने धार्मिक व ऐतिहासिक आणि ज्वलंत सामाजिक विषयांवर आजवर अनेक नाट्य प्रयोग सादर झालेले आहेत. ऐंशी नव्वदच्या दशकात फारसे साधन साहित्य नसताना केवळ कला आणि अभिनयाच्या उत्कृष्ट सादरीकरणाने रसिकांच्या मनावर हेलसच्या नाट्य कलावंतांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पंचक्रोशीतील अनेक गावांत प्रयोग सादर केले गेले. १३४ वर्षांची ही सामाजिक प्रबोधनाची नाट्य परंपरा आज तरूण पिढी जोपासत आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे.- शंकरराव हेलसकर, साहेबराव गुरूजी, जेष्ठ नाट्य कलावंत, श्री गणेश नाट्य मंडळ, हेल

Post Views: 1,425
Please Share
Previous Post

मुलगी पाहण्यासाठी गेले अन्‌ ..!

Next Post

मराठा आरक्षण : आंदोलनाच्या यशाचा मोरेगाव येथे जल्लोष

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मराठा आरक्षण : आंदोलनाच्या यशाचा मोरेगाव येथे जल्लोष

मराठा आरक्षण : आंदोलनाच्या यशाचा मोरेगाव येथे जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ