परभणी : जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी लक्ष ठेवले आहे. त्यांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. १७ सप्टेंबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच
स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...





