देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

३७ गावे ‘पुराचा धोका’ यादीत घ्या

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 29, 2025
in परभणी
0
३७ गावे ‘पुराचा धोका’ यादीत घ्या
Please Share

सेलू तालुक्यातील नदीकाठच्या ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

सेलू : परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात दुधना, करपरा आणि कसुरा या तीन प्रमुख नद्यांच्या काठी असलेल्या ३७ गावांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असून, या गावांचा समावेश ‘पुराचा धोका असलेल्या गावांच्या यादीत’ करण्याची मागणी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी सेलूच्या तहसीलदारांना सोमवारी, २९ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.सेलू तालुक्यातील दुधना नदीच्या लगत वलंगवाडी, सोन्ना, आंबेगाव दिगर, करडगाव, मोरगाव, खुपसा, खेर्डा, डिग्रस, पिंपरी बुद्रुक, पिंपरी खुर्द, शिराळा इत्यादी गावांचा समावेश आहे. तसेच बोरकिन्ही, नरसापूर, नांदगाव, देवगाव, गिरगाव खुर्द, गिरगाव बुद्रुक, सावंगी पी.सी., खैरी, निरवाडी खुर्द, निरवाडी बुद्रुक, गोसावी पिंपळगाव, वाई, राव्हा, पार्डी कौसडी, राजूरा आणि आडगाव दराडे ही गावेही करपरा नदीच्या लगत आहेत. याशिवाय, म्हाळसापूर, कुंडी, गोहेगाव, धनेगाव, डिग्रस जहागीर, ढेंगळी पिंपळगाव, आहेर बोरगाव, सिध्दनाथ बोरगाव आणि झोडगाव ही गावे कसुरा नदीकाठी येतात.नद्यांना पूर आल्याने या गावांच्या शिवारातील शेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीचे साहित्य, जनावरे, जनावरांचा चारा, ठिबक, तुषार, पाइपलाइन, विहिरीची पडझड यासह अनेक गोष्टींची हानी झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने तसेच संततधार व अतिवृष्टीमुळे घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी या नुकसानीचे कोणतेही पंचनामे केलेले नाहीत. या सर्व गावांना पुराच्या धोका असलेल्या गावांच्या यादीत समावेश करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच, उपसरपंच आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत. या वेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवहरी शेवाळे, भास्कर पडघन, दगडोबा जोगदंड, सरपंच गोविंद मगर, भारत इंद्रोके, विकास आढे, भागवत मगर, शशिकांत शिंदे, रामदास साखरे, माणिक साखरे, उद्धव मगर, देवानंद साखरे, ज्ञानोबा मगर, कृष्णा चव्हाण, प्रल्हाद शेळके, आनंदराव मगर, श्रीधर मगर, पिराजी अंभुरे, विजय बोचरे, दतराव काष्टे आदींसह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Post Views: 1,250
Please Share
Previous Post

शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ अनुदान जमा करा

Next Post

आई महोत्सवानिमित्त मंठा देवीचे दर्शन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
आई महोत्सवानिमित्त मंठा देवीचे दर्शन

आई महोत्सवानिमित्त मंठा देवीचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ