देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू बाजार समितीला गतवैभव प्राप्त करून देणार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 16, 2025
in परभणी
0
सेलू बाजार समितीला गतवैभव प्राप्त करून देणार
Please Share

सभापती डॉ.संजय रोडगे यांची पत्रकार परिषदेत माहिती

शेतकरी हितासाठी शिस्त, आधुनिकीकरण, सुविधांवर भर

जनावरांचा बाजार सुरु होणार

२४ ऑक्टोबर रोजी आमसभा

कापूस खरेदी-विक्रीवरील जिल्हा बंदी उठविण्यासाठी प्रयत्न

अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त बाजार समितीची नवीन इमारत उभारणार

सेलू जि.परभणी : सेलू बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांनी गुरुवारी, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत, बाजार समितीच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून व्यवहार पारदर्शकता, कामकाज सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ,बाजार समितीच्या एकूण कामाचा व्याप लक्षात घेऊन कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्याची आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आहे. या जबाबदारीचे सर्व घटकांना संधी सोने करणार विश्वासात घेऊन सोने करणार आहोत. त्यादृष्टीने सेलूच्या व्यापाराला वाढविण्यासाठी तसेच बाजार समितीचे उत्पन्न कसे वाढेल, यासाठी सोयीसुविधा, उपक्रम आणि आधुनिकीकरण यावर प्राधान्याने भर दिला जात आहे. संचालक मंडळ, कर्मचारी, व्यापारी हमाल आदींच्या समन्वय सहकार्यातून सेलूला पुन्हा क्रमांक एकची बाजारपेठ आणि बाजार समितीला गतवैभवप्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे सांगितले.

डॉ.रोडगे म्हणाले की, सध्या मोंढा ठप्प झाल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत, त्यांना दिलासा देऊन गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे. यासाठी सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्मचारी शिस्तीत राहावेत यासाठी त्यांना गणवेश (युनिफॉर्म) बंधनकारक करण्याला आहे. तसेच, वसुली आणि व्यापार परवाने (लायन्स) देण्यासाठी उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांसाठी संगणक प्रशिक्षण देऊन आधुनिकीकरण केले जाणार आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी दररोज बाजारभाव उपलब्ध करून देण्यात येईल आणि हवामानाचा अंदाजही दररोज त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आधुनिक, सेंद्रिय आणि प्रयोगशील शेती करणाऱ्या इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘शेतीनिष्ठ पुरस्कार’ देण्यात येणार आहेत.बाजार समितीची इमारत मोडकळीस आली असून, ‘सन २०१७’ मध्ये नवीन इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा नव्याने प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शासनाच्या निधीतून तसेच मार्केट निधीतून हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. हमाल आणि शेतकऱ्यांसाठी निवास, मार्केट यार्डाचा विकास, चाळणी मशीन आणि वजनकाटा सुरू करण्यासह सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील. दिवाळीनंतरच्या पहिल्या शनिवारी जनावरांचा बाजार पुन्हा सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. विरोधाला बळी न पडता, रोजच्या रोज बीट (लिलाव) काढून आर्थिक उलाढाल वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. फडी, आडते, जिनिंग, हमाल, व्यापारी यांच्या बैठका घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन विविध मालाच्या खरेदीचे बीट सुरू केले आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत बाहेर खरेदी बंद करण्याचे निर्देश सर्वसंबंधितांना दिले आहेत. एका महिन्यात किमान २० लिलाव झाले पाहिजेत, यासाठी मालाची आवक वाढवण्यावर भर दिला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

कापूस आणि हळद खरेदीबाबतचे निर्णय

यंदा पाडव्याला कापूस खरेदीला सुरुवात केली जाणार आहे. कापूस खरेदीसाठीची जिल्हाबंदी उठविण्यासाठी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या माध्यमातून शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. ‘एक’ नोव्हेंबरपासून नियमित कापूस खरेदी सुरू होणार आहे आणि जास्तीत जास्त खरेदी सीबीआय (CCI) मार्फत होणार आहे. सेलू तालुक्यात ‘१५००’ हेक्टरवर हळद घेतली जाते, त्यामुळे हळदीचे बीट देखील घेतले जाणार आहे. बाजार समिती स्थापनेचा बाजार समितीची आमसभा ‘२४’ ऑक्टोबर ‘२०२५’ रोजी साई नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे, असे सभापती डॉ.रोडगे यांनी सांगितले. उपसभापती प्रकाश मुळे, प्रसाद डासाळकर, भास्करराव पडघन माऊली ताठे, ज्ञानेश्वर राऊत, केशवराव सोळंके, सुरेंद्र तोष्णीवाल, अनिल बरडे, प्रभारी सचिव दीपक शिंगणे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण निर्णय…

* बाजार समिती कार्यालयास नवीन इमारत बांधणे. * बाजार समितीच्या मुख्य मोठ्यामध्ये अंतर्गत रस्ते व नाऱ्या तयार करणे* कापूस व भुसार मालाचे लिलाव दररोज काढणे. * बाजार समितीच्या मुख्य कापूस यार्डमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन बांधणे.* कापूस यार्डमध्ये धान्य चाळणी यंत्र सुरू करून शेतकऱ्यांसाठी सुविधा पुरवणे. * बाजार समितीच्या मुख्य कापूस यार्ड मधील इलेक्ट्रिक वजन काटा सुरू करून शेतकऱ्यास सुविधा उपलब्ध करून देणे. * शेतकऱ्यांसाठी जनावरांचा बाजार सुरू करणे. * उप बाजारपेठ वालूर येथे हळद या पिकाचा लिलाव सुरू करणे. * बाजार समितीच्या सर्व व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी संगणीकरण करणे. * बाजार समिती कार्यालयात व मुख्य कापूस यार्ड येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे

Post Views: 1,515
Please Share
Previous Post

मुलींनो, आत्मजाणीव जागृत करा

Next Post

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक उर्जा भरावी : डॉ.हेमंत वैद्य

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक उर्जा भरावी : डॉ.हेमंत वैद्य

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक उर्जा भरावी : डॉ.हेमंत वैद्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ