सेलूतील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानची अक्षर व्याख्यानमाला
सेलू : आजच्या तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या युगात प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याचा आनंद कमी होत आहे, मात्र प्रत्येकाने हे लक्षात घ्यावे की, पुस्तकांच्या वाचनानेच माणूस समृद्ध होतो, असे मत प्रा. दिलीप चव्हाण (नांदेड) यांनी व्यक्त केले.येथे शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान आयोजित अक्षर व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना ‘वाचन संस्कृती आज आणि उद्या’ या विषयावर ते बोलत होते. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वाचन कक्षात ही व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सर्जेराव लहाने हे होते.
या वेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल अक्षर प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांचा तसेच ‘तिफन पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल पक्षी निरीक्षक माणिक पुरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष मोहकरे यांनी केले. डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर संध्या फुलपगार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सतीश मगर, डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर, रामराव गायकवाड, रामराव बोबडे आणि माधव गव्हाणे यांनी पुढाकार घेतला.





