देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹ ९१८.७२ कोटींची थेट मदत

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 5, 2025
in परभणी, मराठवाडा
0
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹ ९१८.७२ कोटींची थेट मदत
Please Share

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती; ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

परभणी, दि.५ नोव्हेंबर: महाराष्ट्र शासनाने परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५ मधील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तसेच रब्बी हंगामातील मशागतीसाठी भरीव आर्थिक मदत मंजूर केली आहे. जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सादर केलेल्या अहवालाच्या आधारे विविध शासन निर्णय निर्गमित करून ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाव्दारे ही माहिती देण्यात आली आहे. पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, अतिवृष्टी, पूरस्थिती तसेच रब्बी हंगामातील मशागतीसाठी शासनाने एकूण ₹ ९१८.७२ कोटींची मदत मंजूर केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने तत्परतेने अहवाल सादर करून मदत वितरणाची प्रक्रिया गतिमान केली आहे. शासनाची ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे, ही पारदर्शकतेची वचनबद्धता दर्शवते.

शासन निर्णयानुसार मंजूर मदत खालीलप्रमाणे आहे:

क्र.कालावधी / क्षेत्रबाधित खातेदार (संख्या)मदत रक्कम (कोटी रुपये)
१जून ते ऑगस्ट २०२५ अतिवृष्टी२,३८,५३०१२८.५५
२सप्टेंबर २०२५ अतिवृष्टी (० ते २ हेक्टर)४,३९,२९७२४५.६४
३सप्टेंबर २०२५ अतिवृष्टी (२ ते ३ हेक्टर)३९,४५२४९.४२
४परभणी विभाग (रब्बी मशागत)४,३९,२९७४९५.११
एकूण९१८.७२

थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ज्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झाली नाही, त्यांनी तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून शासनाची मदत त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकेल. तसेच सामायिक खात्यांच्या बाबतीत मदत जमा करण्यासाठी लेखी संमतीपत्र व आवश्यक कागदपत्रे संबंधित गावकामगार तलाठी/ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयात त्वरित सादर करावी लागतील. खाते क्रमांक, आधार कार्ड किंवा फार्मर आयडीमध्ये विसंगती असल्यास ती माहिती त्वरित दुरुस्त करावी. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित तालुका कृषी अधिकारी, बँक अधिकारी तसेच सेतू केंद्रांना शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाची ही मदत कोणत्याही मध्यस्थांशिवाय थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.


Post Views: 1,501
Please Share
Previous Post

सेलूतील श्नीनृसिंह कार्तिकी उत्सव सुरू

Next Post

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा : सेलू न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा : सेलू न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा : सेलू न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

शेलगाव शिवार परिसरातील घटना; तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : मंगरुळपीर लगतच्या शेलगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिम पेट्रोल...

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ