देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अक्षर शेतीची साधना महत्त्वाची : संमेलनाध्यक्ष डॉ.आसाराम लोमटे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 18, 2025
in परभणी, मराठवाडा
0
अक्षर शेतीची साधना महत्त्वाची : संमेलनाध्यक्ष डॉ.आसाराम लोमटे
Please Share

सेलू (रंगाचार्य गुरुजी मंचावरून…) : अक्षर प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय अक्षर साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात संमेलनाचे अध्यक्ष तथा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त डॉ.आसाराम लोमटे म्हणाले की, ज्यांना बोलायचे–लिहायचे ते गप्प का आहेत? समाजातील सर्व प्रश्नांवर लिहिणे गरजेचे आहे. साहित्यातून अमृत निर्माण होते आणि अक्षरांची शेती ही अतिशय महत्त्वाची साधना आहे. शेतकरी जसे बीज जपतो तसे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.सेलू येथील अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने रविवारी, १६ नोव्हेंबर रोजी आयोजित अक्षर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. उद्घाटक प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ.आसाराम लोमटे, माया लोमटे, प्रकाश होळकर, मार्तंड कुलकर्णी, श्रीधर नांदेडकर, राजेश गायकवाड, कौतिकराव ठालेपाटील, विनायकराव कोठेकर, सर्जेराव लहाने, डॉ. संजय रोडगे, एस. एम. लोया, जयप्रकाश बिहाणी, शरद कुलकर्णी, विलास संदीकर आदी मान्यवर उपस्थित होते.यांनी मराठी वाचनसंस्कृतीच्या संवर्धनाची गरज अधोरेखित केली. रंगाचार्य गुरुजी मंचावरून बोलताना त्यांनी सांगितले की, साहित्यकार शब्द आणि संवादातून जगण्याचे सत्य व्यक्त करतो आणि नाटक–चित्रपटांच्या माध्यमातून साहित्य जागतिक पटलावर पोहोचते. “वाचनालयांनी आमची बालपणं घडवली” असे सांगून त्यांनी वाचनसंस्कृती टिकवण्याचे आवाहन केले.ते पुढे म्हणाले की, बालपणी पुस्तके विकत घेणे शक्य नव्हते, त्यामुळे वाचनालय हेच ज्ञानाचे दार होते. आज खर्च कुठे करतो हे पाहणे आवश्यक आहे. दूरदर्शनवर साहित्य प्रदर्शित व्हावे, प्रत्येकाने वाचनालयात जाऊन पुस्तके वाचावीत, मध्यमवर्गाने साहित्य खरेदीत सहभाग घ्यावा, त्यामुळे साहित्य–संस्कृती टिकून राहील. वर्तमानपत्रे दृष्टिकोन निर्माण करणारी असून तरुण पिढीत वाचनाची सवय घटत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मराठी शाळा बंद होत असल्याचे नमूद करून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी मांडली. मातृभाषेत शिक्षण झाले तर जीवन जगणे सुलभ होते; इंग्रजी ही फक्त भाषा असून ज्ञानाची भाषा मराठी आहे, असे ते म्हणाले.नाटक–साहित्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, नाट्यकला ही साहित्याच्या महावृक्षाची फांदी असून नाटक हे साहित्याच्या पोटातून जन्म घेते. मुंबई–सेलू प्रवासातील आठवणी सांगून त्यांनी साहित्य–नाट्य क्षेत्रातील सांस्कृतिक पूल जपण्याचे महत्त्व व्यक्त केले.डॉ. मार्तंड कुलकर्णी, प्रकाश होळकर, प्राचार्य कौतीकराव ठालेपाटील, राजेश गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि रंगाचार्य गुरुजी यांच्या प्रतिमापूजनाने झाली. सच्चीतानंद डाखोरे, पूजा तोडकर आणि विद्यार्थी संचाने महाराष्ट्र गीत सादर केले. प्रास्ताविक विनायकराव कोठेकर, स्वागत सर्जेराव लहाने, सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले तर आभार सरचिटणीस डॉ. शरद कुलकर्णी यांनी मानले.अक्षरायण प्रकाशनया संमेलनाची ‘अक्षरायण’ स्मरणिका पालखीद्वारे मंचावर आणून मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. प्रा. अशोक पाठक यांचे उजेडाला पंख फुटले, रमेश बोराडे यांचे चक्रव्यूह, तसेच प्रा. हनुमान मुरगुळे, प्रा. अनंत काटकर, शेख मजहर यांचे दिवाळी अंक यांचे प्रकाशनही यावेळी झाले. जिल्ह्यातील साहित्य–कला क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.

Post Views: 1,871
Please Share
Previous Post

बालपणातील कलाविष्कार ही आयुष्यभराची शिदोरी

Next Post

डॉ.लोमटे यांचा संमेलनाध्यक्ष म्हणून सन्मान मोलाचा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
डॉ.लोमटे यांचा संमेलनाध्यक्ष म्हणून सन्मान मोलाचा

डॉ.लोमटे यांचा संमेलनाध्यक्ष म्हणून सन्मान मोलाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ