देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

१० लाख ४५ हजार मतदार बजावणार हक्क; प्रशासन सज्ज

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 6, 2026
in परभणी
0
१० लाख ४५ हजार मतदार बजावणार हक्क; प्रशासन सज्ज
Please Share

परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज, निर्भयपणे मतदानाचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आवाहन

परभणी : परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असून, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे आपला अमूल्य हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

जिल्ह्यात एकूण ७०५ ग्रामपंचायती असून जिल्हा परिषदेच्या ५४ गट तर पंचायत समितीच्या १०८ गणांसाठी ही निवडणूक होत आहे. सेलू तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५ गट तर पंचायत समितीचे १० गण आहेत. याशिवाय जिंतूर १० गट, २० गण; मानवत ४ गट, ८ गण; पाथरी ५ गट, १० गण; सोनपेठ ३ गट, ६ गण; परभणी १० गट, २० गण; गंगाखेड ७ गट, १४ गण; पालम ४ गट, ८ गण तर पूर्णा तालुक्यात ६ गट व १२ गणांसाठी मतदान होणार आहे.

१० लाख ४५ हजार मतदारांसाठी १,२७८ केंद्रे

जिल्ह्यात एकूण १,२७८ मतदान केंद्रे असून १० लाख ४५ हजार ८५५ मतदार आपला हक्क बजावतील. यामध्ये ५ लाख ४२ हजार ९३७ पुरुष मतदार, ५ लाख २ हजार ९१३ स्त्री मतदार तर ५ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांमधील मतदान क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचारी यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश सर्व आस्थापना, कारखाने आणि दुकानांना लागू राहतील. अपवादात्मक परिस्थितीत सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत देणे बंधनकारक राहील. तसेच मतदान केंद्रावर मोबाईल फोन वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी वडगाव सुक्रे, टाकळी बोबडे, ढेगळे पिंपळगाव, पाथरगव्हाण बु, वाघाळा, गंगाखेड शहर, केकरजवळा, गोगलगाव, पालम शहर, शेळगाव म., शिर्शि बु., कावी, आडगाव आणि कात्नेश्वर येथील आठवडी बाजार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद राहतील.

९ फेब्रुवारीला मतमोजणी

या निवडणुकीची मतमोजणी सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी पार पडणार आहे. त्यासाठी सेलू, मानवत, सोनपेठ, पालम व पूर्णा येथे तहसील कार्यालयात, जिंतूर व पाथरी येथे आयटीआयमध्ये, परभणी येथे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि गंगाखेड येथे नवीन उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी मतमोजणीची केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

Post Views: 1,893
Please Share
Previous Post

वृत्तपत्र विक्रेत्यांचा विमा काढून वाढदिवस साजरा

Next Post

सेलू तालुक्यात मतदानासाठी प्रशासन सज्ज

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू तालुक्यात मतदानासाठी प्रशासन सज्ज

सेलू तालुक्यात मतदानासाठी प्रशासन सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ