देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

सेलू उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी घेतला आढावा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 4, 2026
in मराठवाडा
0
सेलू उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा; नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी घेतला आढावा
Please Share

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या सूचनेवरून भेट; रुग्णांनी व्यक्त केले समाधान

सेलू : राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सूचनेवरून सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी सोमवारी, २ मार्च २०२६ रोजी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधोपचार आणि सोयीसुविधांची सविस्तर माहिती घेतली.

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांनी रुग्णसेवेबाबत सविस्तर अहवाल सादर केला.या भेटीदरम्यान रुग्णालयातील अद्ययावत सुविधांची माहिती त्यांनी घेतली आहे. रुग्णालयात नियमित प्रसूतीसह सिजेरियन शस्त्रक्रियांची सोय उपलब्ध आहे. तसेच हर्निया, अपेंडिक्स, गर्भाशय पिशवी आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन नियमितपणे केले जातात. किडनी विकाराने ग्रस्त रुग्णांसाठी ६ खाटांचे महाडायलिसिस केंद्र कार्यरत आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयात अतिशय उच्च दर्जाचे १५ खाटांचे आयसीयू (ICU) कक्ष उभारण्यात आले असून, गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी आणि क्ष-किरण (X-ray) सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.रुग्णालयातील प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त व लघवी चाचण्यांसह लिपिड प्रोफाईल आणि थायरॉईडच्या चाचण्या विनामूल्य केल्या जातात. सर्व प्रकारची औषधे, गोळ्या आणि इंजेक्शन रुग्णांना मोफत दिली जात आहेत. रुग्णालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळण्यासाठी १० वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत, ज्यात एम.एस. सर्जरी आणि एम.एस. ओबीजीवाय अशा तज्ज्ञांचा समावेश आहे. याशिवाय १२ परिचारिका, ४ सफाई कामगार, २ औषध निर्माता, २ क्ष-किरण तंत्रज्ञ, २ पॅथॉलॉजिस्ट आणि ४ लिपिक रुग्णसेवेसाठी अहोरात्र झटत आहेत.नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता, रुग्णांनी मिळणाऱ्या आरोग्य सेवेबाबत पूर्ण समाधान व्यक्त केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, नगरसेवक मनीष कदम, बालाजी झमकडे, प्रशांत ठाकूर, बाळासाहेब काजळे, दीपक कोल्हाळ, सुबोध काकडे, गौतम कनकुटे, सतीश भोसले, सागर आगजाळ आदींची उपस्थिती होती.

Post Views: 1,701
Please Share
Previous Post

सेलूच्या शिवराज सूर्यवंशीचे प्रेरणादायी यश

Next Post

ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्याची जय्यत तयारी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्याची जय्यत तयारी

ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्याची जय्यत तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ