देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ज्ञानेश्वरीबन, गाथाबन फुलवा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 18, 2026
in परभणी
0
ज्ञानेश्वरीबन, गाथाबन फुलवा
Please Share

ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे आवाहन

तारूण्य त्यागाने शोभते : संजय महाराज पाचपोर

सेलू : आजच्या काळात वृक्षतोड हा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही सृष्टी जिवंत ठेवायची असेल तर ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांच्या नावाने प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे. त्या प्रत्येक झाडावर एक ओवी लावावी. पडीक जमिनीवर सुखी भविष्यासाठी ज्ञानेश्वरीबन आणि गाथाबन तयार करा, असे प्रतिपादन ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) यांनी केले आहे.

अलंकापुरी नगरीत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात बुधवार दिनांक १८ रोजी त्यांची प्रवचन सेवा संपन्न झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपले नवीन वर्ष पाडव्यापासून सुरू होते. नवीन वर्षाचे स्वागत निसर्गही करतो. या निमित्ताने प्रत्येक घरात आणि गावात पारायणे व्हावीत. प्रत्येकाने झाड लावून ते जगवावे, निर्व्यसनी जीवन जगावे आणि जातमुक्त व्हावे असा संकल्प करायला हवा. अठरापगड जाती जेव्हा एकत्र येतील, तेव्हाच भारत अधिक समृद्ध होईल. या सोहळ्यास बाळूमामा झमकडे, गंगाधर आडळकर, रामप्रसाद साबू, राजेंद्र प्रसादजी मनियार, मुकुंद आष्टीकर, शिवनारायणजी नंदकिशोरजी बाहेती, डॉ. उमेश गायकवाड, डॉ. आशिष मेहता, प्रताप शिंदे, अप्पू सोळंके, नंदा भुतडा यांची विशेष उपस्थिती होती.

तारूण्य त्यागाने शोभते : संजय महाराज पाचपोर

दुसऱ्या सत्रात बोलताना गोसेवक ह.भ.प. संजय महाराज पाचपोर म्हणाले की, मानवी जन्मात प्रपंचासाठी वयाची गरज असली तरी परमार्थासाठी वयाची अट नसते. तारुण्य हे भोगाने शोभत नसून केवळ त्यागाने शोभते. मंगळवार दिनांक १७ रोजी रात्री फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यातील कीर्तनाचे पुष्प गुंफताना त्यांनी हे विचार मांडले. भगवंताला निरपेक्ष भक्ती आवडते आणि अशा व्यक्तींची अपेक्षा ईश्वर व समाज पूर्ण करतो. फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या यशामागे मोठी साधना आहे. मागील अनेक वर्षांपासून पंडित महाराज डाके यांनी २०० गावांत या सोहळ्याचे आयोजन केले होते. या पारायणांच्या माध्यमातून मोठी धर्मजागृती सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Post Views: 1,657
Please Share
Previous Post

निरपेक्ष सेवेतून जग जिंकता येते

Next Post

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली अलंकापुरीनगरी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली अलंकापुरीनगरी

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली अलंकापुरीनगरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ