देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शेतीसाठी पाणी उपलब्धता वाढविण्यास प्राधान्य द्यावे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 11, 2026
in परभणी
0
शेतीसाठी पाणी उपलब्धता वाढविण्यास प्राधान्य द्यावे
Please Share

जलसंधारण व सिंचन क्षमतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला आढावा

परभणी, दि. ११ : शेतकऱ्यांना शेतीकरीता पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसाठा वाढवणे, सिंचन क्षमता विस्तार करणे आणि पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

मुंबई येथील निर्मल भवन येथे एमएसआरडीसी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत भूजल पातळी वाढविण्यासाठी व्यापक उपाययोजनांची आवश्यकता. अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाटाचे पाणी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर , पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी तलाव, तळी, धरणे आणि कालव्यांच्या दुरुस्ती व सक्षमीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात त्यांनी दिल्या.

*पुराचे पाणी प्रभावीपणे साठविण्याचे नियोजन*

दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पावसाचे आणि पुराचे पाणी वाहून जाते यावर उपाय म्हणून नद्या व तलावांचे खोलीकरण, नवीन चेकडॅम व बंधारे उभारणे, नाला बांधकाम सुधारणा तसेच पुराचे पाणी प्रभावीपणे साठविण्याचे नियोजन करावे.

*पूरनियंत्रणाची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत*

अनेक गावांना नदीच्या पुरामुळे धोका निर्माण होत असल्याने अशा ठिकाणी तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावांची सुरक्षा महत्त्वाची असून पूरनियंत्रणाची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना श्रीमती बोर्डीकर यांनी दिले.

*कामांचे नियमित ऑडिट करण्याचे निर्देश*

पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता सर्व कामांचे नियमित ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्याबरोबरच ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना अधिक परिणामकारकरित्या अंमलात आणावी. धरणांतील गाळ काढून तो शेतीसाठी वापरण्याकरीता शेतकऱ्यांना पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

*पाणी साठवण व्यवस्थेत सुधारणा*

बैठकीत सध्या अनेक गावे टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर अवलंबून असल्याची माहिती देण्यात आली. काही गावांमध्ये नियमित दोन ते तीन टँकर सुरू असून भविष्यात पाणी साठवण व्यवस्थेत सुधारणा झाली नाही तर आणखी गावांना टँकरची गरज भासू शकते, काही ठिकाणी पूर्वीची कामे अपूर्ण आहेत ते तातडीने पूर्ण करावेत. संपूर्ण नदीपात्राचे वैज्ञानिक पद्धतीने रुंदीकरण, गाळ काढणे आणि पावसाळ्यापूर्वी नियोजनबद्ध कामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले

*पाइपलाइनद्वारे पाणी वितरण*

शेतकऱ्यांसाठी सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने पाइपलाइनद्वारे पाणी वितरण, प्रेशर इरिगेशन प्रणाली, ठिबक सिंचन आणि कार्यक्षम पाणी वापर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देण्यात आला. बंद पाइपलाइन प्रणालीमुळे पाण्याची गळती कमी होऊन अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.पाण्याची बचत, जलसाठा वाढ आणि शाश्वत सिंचन व्यवस्थेमुळे शेती उत्पादनवाढीस चालना मिळेल, असे श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

Post Views: 1,538
Please Share
Previous Post

रांजणी येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

Next Post

नूतनच्या २१ खेळाडूंचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतनच्या २१ खेळाडूंचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नूतनच्या २१ खेळाडूंचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ