देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

पेपर फुटी लज्जास्पद; शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा‌

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 27, 2026
in मराठवाडा
0
पेपर फुटी लज्जास्पद; शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा‌
Please Share

शासकीय व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरल्याचा मराठवाडा शिक्षक संघाचा आरोप

परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रांवर दिनांक २८ जून रोजी प्रस्तावित असलेल्या टीईटी (TET) परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करावी लागणे ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. शासकीय व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरून निघालेली आहे, त्याचेच हे द्योतक असल्याची टीका मराठवाडा शिक्षक संघाचे परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मुळात डी.एड. व बी.एड. ही शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्याची गरजच नाही. परंतु शिक्षकांच्या नोकरीवर टीईटीची टांगती तलवार लावण्यात आली आहे. आधीच विविध अशैक्षणिक कामांच्या बोजाखाली शिक्षक पार दबून गेला असून, त्यात अशा पद्धतीने पेपर फुटणे हे शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचीच नव्हे तर सरकारची विश्वासार्हता संपली आहे. नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीची जबाबदारी घ्यायला केंद्रीय शिक्षणमंत्री तयार नाहीत, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आता टीईटी पेपरफुटीमुळे शिक्षकांना आत्महत्येस प्रवृत्त करायचे आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स, अधिकारी यांना नोकरी लागल्यावर कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही, मग शिक्षकांनाच का? असा सूर सध्या शिक्षकांमध्ये आहे. खरं तर परीक्षा नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांना परीक्षा कशी घ्यावी, यासाठी एक परीक्षा अनिवार्य करावी, असा टोलाही त्यांनी लगावला. या पेपरफुटीला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई होणे नितांत गरजेचे आहे, तसेच महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी या पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद यांनी केली आहे.

Post Views: 1,436
Please Share
Previous Post

पत्रकारांना धमक्या देणार्‍या खा.संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा

Next Post

टीईटी पेपरफुटी : शिक्षकांची प्रचंड अवहेलना व मानहानी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
टीईटी पेपरफुटी : शिक्षकांची प्रचंड अवहेलना व मानहानी

टीईटी पेपरफुटी : शिक्षकांची प्रचंड अवहेलना व मानहानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

धनंजय चौधरी जिल्ह्यात १२ वा, तर मधुर कुलकर्णी २१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण; गुणवंतांचे सर्व स्तरांतून कौतुक सेलू/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा...

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

सेलू : भारतीय जनता पार्टी सेलू युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी नागेश गणेशसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर...

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

कृषी महाविद्यालय सेलूच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; प्रभात फेरी आणि वृक्षारोपणाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष केमापूर : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या...

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा कृषी दिनानिमित्त उपक्रम कुंडी (ता. सेलू) : सेलू येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयातर्फे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ