देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नारायण चौरे यांना ‘मराठवाडा आदर्श शिक्षक पुरस्कार’

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 27, 2026
in परभणी
0
नारायण चौरे यांना ‘मराठवाडा आदर्श शिक्षक पुरस्कार’
Please Share

आपुलकी व आस्था संस्थेच्या वतीने गौरव, श्रीराम प्रतिष्ठानतर्फे सत्कार

सेलू : ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, जिद्दीच्या बळावर शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे ‘श्रीराम प्रतिष्ठान’चे विज्ञान शिक्षक नारायण बाबुराव चौरे यांना सेलू येथे आपुलकी व आस्था संस्थेच्या वतीने २६ जुलै २०२६ रोजी “मराठवाडा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६” देऊन गौरविण्यात आले.

वांजोळा (जि. जालना) येथील रहिवासी असलेल्या चौरे यांचे वडील बाबुराव चौरे परिसरात ‘रामायण वाचक’ म्हणून प्रसिद्ध असून आई मंगल चौरे शेतात कष्ट करतात. तर पत्नी अयोध्या चौरे नोकरी करत कौटुंबिक जबाबदारी सांभाळतात. श्री.चौरे यांनी प्राथमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय आंबा येथून पूर्ण केल्यानंतर नूतन महाविद्यालयातून बी.एस्सी. केले. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे छत्रपती संभाजीनगर येथे नोकरी करत त्यांनी एम.सी.एम. पदवी पूर्ण केली.

२०११ पासून ते ‘श्रीराम प्रतिष्ठान’ सेलू येथे विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजेश काळे यांची मोलाची साथ लाभली.त्यांनी स्वतः तयार केलेल्या विज्ञान शैक्षणिक साहित्यामुळे परभणी जिल्ह्याला सलग तीन वर्षे (२०२३ ते २०२५) राज्य स्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळाली. विज्ञान प्रदर्शनात त्यांनी दोन वेळा राष्ट्रीय व चार वेळा राज्य स्तरावर यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ‘सायन्स चॅलेंज’, ‘माय सायन्स लॅब ॲट होम’, ‘वर्गातील विज्ञान कोपरा’ व ‘परिपाठातील प्रयोग’ यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले.या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे आणि वांजोळा येथील विठ्ठल सरकटे व गावकऱ्यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.

“नारायण चौरे यांच्यासारखे प्रयोगशील आणि ध्येयवादी शिक्षक लाभणे हे श्रीराम प्रतिष्ठानचे मोठे भाग्य आहे. त्यांनी विज्ञानाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या घराघरांपर्यंत पोहोचवले आहे. या बहुमानामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.”- डॉ. संजय रोडगे (संस्थापक अध्यक्ष, श्रीराम प्रतिष्ठान सेलू)

“माझ्या वडिलांचे धार्मिक संस्कार, आईचे कष्ट आणि पत्नीची साथ यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. तसेच संकटाच्या काळात राजेश काळे यांची मिळालेली सोबत आणि श्रीराम प्रतिष्ठानने दिलेला विश्वास यामुळे हे कार्य करू शकलो. हा पुरस्कार माझ्या कुटुंबाला, गावकऱ्यांना आणि संस्थेला समर्पित आहे.” – नारायण चौरे (पुरस्कारप्राप्त शिक्षक)

Post Views: 1,663
Please Share
Previous Post

नूतन प्राथमिक शाळेचे २४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

Next Post

स्वच्छता निकषांची काटेकोर अंमलबजावणी करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
स्वच्छता निकषांची काटेकोर अंमलबजावणी करा

स्वच्छता निकषांची काटेकोर अंमलबजावणी करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ