देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
in परभणी
0
राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड
Please Share

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद

सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा नूतन विद्यालय सेलू येथे २ ऑगस्ट रोजी पार पडल्या. या स्पर्धेत १० ते ५५ वर्षे वयोगटातील परभणी, सेलू, गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यातून ७० योगपटूंनी सहभाग नोंदवला. यात ट्रॅडिशनल योगासन, आर्टिस्टिक सिंगल, आर्टिस्टिक पेअर व रिदमिक पेयर या प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या.

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीचे अध्यक्ष डॉ. शरद कुलकर्णी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेलू नगरपरिषदेचे शिक्षण व क्रीडा सभापती मिलिंद पवार, डॉ. रुपेश दोडिया, देविदास सोन्नेकर, गिरीश बोरगावकर, नागेश कान्हेकर, कृष्णा कवडी, गणेश माळवे, प्रशांत नाईक आणि माधव देशपांडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात बोलताना सेलू नगरपालिकेचे सदस्य तथा शिक्षण व क्रीडा सभापती मिलिंद पवार म्हणाले, “भारतीय योगासनामुळे बालवयातच विद्यार्थ्यांना नीतिमत्तेचे शिक्षण आणि योग्य संस्काराची शिदोरी प्राप्त होते.” तसेच त्यांनी ऑस्ट्रेलिया येथे संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लेक्रॉस स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या नूतन महाविद्यालयाचा खेळाडू अजय चव्हाण यास २१,००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

या प्रसंगी वासुदेव योग सेंटरच्या शौर्य फटाले, सानवी झाल्टे, यशिका खराटे आणि काव्या राजवाडकर यांनी आकर्षक योगासन प्रात्यक्षिके सादर केली. समारोप कार्यक्रमात विजेत्या खेळाडूंना प्राविण्य प्रमाणपत्रे व पदके प्रदान करण्यात आली, तसेच सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.स्पर्धेत कृष्णा कवडी, माधव देशपांडे, सोमनाथ महाजन, रामा गायकवाड, डॉ. चेतन कुमार भागवत, लक्ष्मीकांत फटाले, सुष्मिता भरदम, शिल्पा बर्डे, प्रतिज्ञा चव्हाण, अनुजा सुभेदार, शिल्पा पिंपळे, पुष्पा काकडे, शितल खंदारे, श्रुती खंदारे, सलोनी जमदाडे, कु. रकटे, श्रावणी काकडे आणि प्रियंका रोकडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. निवड झालेल्या सर्व खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू : या स्पर्धेतून शौर्य फटाले, तथास्तु रकटे, अनुज टमखाने, सानवी झाल्टे, आराध्या आकाशे, सुप्रिया इंद्रोके, ओमकार गजमल, कृष्णा बादल, अर्णव आघाव, शिवानी शेंडगे, शिवानी रेकडगे, दिनेश देवकते, पुष्पा काकडे, शितल खंदारे, सलोनी जमदाडे, चैतन्य पाळवदे, भागवत चेतन कुमार, गवळी विकास, सुष्मिता भरदम, प्रतिज्ञा चव्हाण, शिल्पा बर्डे, लक्ष्मीकांत फटाले, प्रशांत घिके, रामा गायकवाड आणि गोविंद आघाव यांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Post Views: 1,652
Please Share
Previous Post

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

Next Post

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ