जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

परभणी : जिल्हा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पोलीस अंमलदार बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने गुरुवार, २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यामार्फत – मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची सूट देऊन पदोन्नती देण्यात यावी व त्याचे लाभ मिळावे. सेवेत असलेल्या अंमलदाराप्रमाणे आरोग्य सुविधा द्याव्यात. पोलीस मतदार सघ स्थापन करण्यात यावा. संस्थेसाठी जागा देण्यात यावी. पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्यांना दहा टक्के आरक्षण मिळावे तसेच सेवेतील व सेवा निवृत्ती झालेल्या अंमलदाराचे पाल्यांना पोलीस बॉईज प्रमाणपत्र देण्यात यावे. अशा मागण्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पोलीस आमदार बहुउद्देशीय विकास संस्था जिल्हाध्यक्ष शिवाजी कोटे उपाध्यक्षमाधव लोकुलवार, सचिव जळबाजी गायकवाड, श्यामलता साळवे सदाशिव नगरशाळे, भीमराव कांबळे, गणेशराव कदम, अब्दुल खालिक, कोटकर,कैलास कुरवाडे, चंद्रकांत साखरे, परमेश्वर काकडे, अशोक वैद्य, राजेभाऊ कातकडे, अली भाई यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





