देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणी जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 31, 2026
in परभणी
0
परभणी जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
Please Share

दावे व हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत; मतदारांनी आपले नाव व तपशील तपासून आवश्यक असल्यास तात्काळ अर्ज करावा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

नो मॅपिंग प्रकरणांची सुनावणी, ॲनोमली नोंदींची पुराव्यांच्या आधारे पडताळणी होणार; प्रारूप मतदार यादीची प्रत पक्ष प्रतिनिधींना सुपूर्द

परभणी, दि. ३१ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण-२०२६ (SIR) अंतर्गत परभणी जिल्ह्यातील चारही (९५-जिंतूर, ९६-परभणी, ९७-गंगाखेड, ९८-पाथरी) विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी आज, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. मतदारांनी प्रारूप यादीत आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून काही त्रुटी असल्यास किंवा पात्र असूनही नाव समाविष्ट नसल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत विहित नमुन्यात दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

अंतिम मतदार यादी दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिध्द होणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अरुणा संगेवार, परभणी जिल्ह्यातील मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या अध्यक्ष, सचिव तसेच अधिकृत प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. बैठकीस बहुजन समाज पार्टीचे जाफरखान मुसाखान, आम आदमी पार्टीचे शेख हुसेन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अक्षय भगवानराव जगताप, भारतीय जनता पार्टीचे आकाश रवी पोटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे संभानाथ काळे आणि वंचित बहुजन आघाडीचे पंचांगे दीपक उपस्थित होते.प्रारुप याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय, मतदान केंद्र येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादीची प्रत देण्यात आली. तसेच दावे व हरकती दाखल करण्याची प्रक्रिया, नो मॅपिंग (No Mapping), ॲनोमली (Anomaly), अनुपस्थित / शोधूनही न सापडलेले, कायमस्वरूपी स्थलांतरित, मयत, अन्यत्र मतदार म्हणून नोंद / Duplicate ( ASDD) तसेच अनकलेक्टबल इएफएस (Uncollectable EFs) बाबतची कार्यवाही आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.परभणी जिल्ह्यातील एसआयआर कामाची सद्यस्थितीदि. २४ ऑगस्ट २०२६ च्या SIR Status Report नुसार परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १५ लाख ४१ हजार ७ मतदार असून १,६२३ बीएलओ कार्यरत आहेत. सर्व बीएलओकडून ईएफ फॉर्म डाउनलोडचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून १५,४१,००७ ईफ ची छपाई व वितरणही १०० टक्के पूर्ण झाले आहे.यापैकी १३,६०,७५८ ईफचे डिजिटायझेशन व पडताळणी पूर्ण झाली असून त्याचे प्रमाण ८८.३० टक्के आहे. जिल्ह्यात १,८०,२४९ Uncollectable EFs, १६,४२८ No Mapping आणि ५,३२८ Anomaly नोंदी असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

विधानसभा मतदारसंघनिहाय No Mapping व Anomaly नोंदीविधानसभा मतदारसंघनिहाय No Mapping नोंदी पुढीलप्रमाणे आहेत: जिंतूर – २,६७५, परभणी – ८,७४०, गंगाखेड – १,३८७, पाथरी – ३,६२६, एकूण – १६,४२८.तर Anomaly नोंदींची संख्या जिंतूरमध्ये १,५७२, परभणीत ५२६, गंगाखेडमध्ये १,०११ आणि पाथरीमध्ये २,२१९ असून जिल्ह्यातील एकूण Anomaly नोंदी ५,३२८ आहेत.१ लाख ८० हजार २४९ Uncollectable EFs चे वर्गीकरणबैठकीत Uncollectable EFs बाबतही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली.

एकूण १,८०,२४९ Uncollectable EFs चे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे: * ४२,५७४ – अनुपस्थित / शोधूनही न सापडलेले * ७३,६२८ – कायमस्वरूपी स्थलांतरित * ३७,४०८ – मयत * २५,९८३ – अन्यत्र मतदार म्हणून नोंद / Duplicate * ६५६ – इतर प्रकरणेसदर वर्गीकरण अंतिम नसून प्रारूप स्वरूपाचे आहे. दावे व हरकती, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि सक्षम प्राधिकाऱ्याच्या निर्णयानंतर अंतिम कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.BLO कडून घरभेटी व पडताळणीनंतर वर्गीकरणUncollectable म्हणून वर्गीकरण करण्यापूर्वी संबंधित BLO मार्फत मतदाराच्या पत्त्यावर घरभेट देऊन पडताळणी करण्यात आली. मतदार उपलब्ध नसल्यास निर्देशानुसार पुन्हा भेटीचे प्रयत्न करण्यात आले. कायमस्वरूपी स्थलांतरित, मयत अथवा Duplicate मतदारांच्या बाबतीत उपलब्ध माहिती, अभिलेख व आवश्यक कागदपत्रांच्या आधारे वर्गीकरण करण्यात आले.मयत मतदारांच्या बाबतीत उपलब्ध अधिकृत नोंदी, मृत्यू प्रमाणपत्रे किंवा कुटुंबीयांकडून प्राप्त कागदपत्रांचा आधार घेण्यात आला. अन्यत्र मतदार म्हणून नोंद असलेल्या व्यक्तींच्या नोंदींचीही आवश्यक पडताळणी करण्यात आली. पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ नये, यासाठी संबंधित पात्र मतदारांना विहित प्रक्रियेद्वारे आवश्यक अर्ज दाखल करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.No Mapping म्हणजे नाव वगळलेच असे नाहीSIR प्रक्रियेत No Mapping म्हणून आढळलेल्या १६,४२८ नोंदींबाबत प्रशासनाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. No Mapping असणे म्हणजे संबंधित मतदार अपात्र ठरला आहे किंवा त्याचे नाव अंतिम मतदार यादीतून निश्चितपणे वगळण्यात आले आहे, असा अर्थ होत नाही. संबंधित प्रकरणांची आवश्यक पडताळणी करून आवश्यकतेनुसार सुनावणी घेण्यात येणार आहे.संबंधित मतदारांना आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करण्याची संधी दिली जाईल. कागदपत्रे, उपलब्ध अभिलेख व इतर संबंधित बाबींची पडताळणी करून सक्षम प्राधिकाऱ्याकडून योग्य व कारणयुक्त आदेश पारित करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.Anomaly नोंदींची पुराव्यांच्या आधारे पडताळणीजिल्ह्यातील ५,३२८ Anomaly प्रकरणांमध्ये संबंधित मतदारांकडून आवश्यक पुरावे व कागदपत्रे घेण्यात येतील. या कागदपत्रांची प्रामाणिकता, ग्राह्यता आणि संबंधित मतदार नोंदीशी सुसंगतता तपासण्यात येणार आहे. पडताळणीअंती सक्षम प्राधिकाऱ्याकडून आवश्यक आदेश पारित करण्यात येईल. पात्रता सिद्ध झाल्यास संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबत नियमानुसार निर्णय घेतला जाईल.दावे व हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतप्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.

कोणता अर्ज कशासाठी? * Form-६ : पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी. * Form-७ : अपात्र, मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे मतदार नोंदीबाबत हरकत घेण्यासाठी अथवा नाव वगळण्यासाठी. * Form-८ : विद्यमान मतदाराच्या नावातील, पत्त्यातील किंवा इतर तपशिलातील दुरुस्ती अथवा आवश्यक बदलासाठी.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावरही फॉर्म-६, फॉर्म-७, फॉर्म-८ अधिकृत स्वरुपात उपलब्ध आहे. दावे व हरकती संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) तसेच नियमानुसार नियुक्त BLO यांच्यामार्फत दाखल करता येतील. उपलब्ध ऑनलाइन सुविधेचाही नागरिकांना वापर करता येणार आहे.ERO च्या आदेशाविरुद्ध अपीलची तरतूदमतदार यादीतील नोंदीबाबत ERO यांनी पारित केलेल्या आदेशामुळे संबंधित व्यक्ती व्यथित असल्यास, लागू कायदेशीर तरतुदीनुसार अपील करण्याचा अधिकार आहे. Representation of the People Act, १९५० मधील कलम २४ अंतर्गत कलम २२ किंवा २३ अन्वये ERO यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध विहित पद्धतीने अपील करता येते. बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दावे-हरकती तसेच अपील प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.ASDD याद्या विविध कार्यालयांत व संकेतस्थळावर उपलब्धमतदारांच्या सोयीसाठी ASDD याद्या नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय, महानगरपालिका कार्यालय तसेच मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयांतील नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच परभणी जिल्हा प्रशासनाच्या parbhani.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरही संबंधित माहिती व याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आपले नाव, भाग क्रमांक, अनुक्रमांक, पत्ता आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मतदान केंद्रांमध्ये वाढपरभणी जिल्ह्यात मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेनंतर १५ मतदान केंद्रांची वाढ होऊन मतदान केंद्रांची संख्या १,६२३ वरून १,६३८ झाली आहे. नवीन मतदान केंद्रांसाठी आवश्यकतेनुसार BLO नियुक्त करण्यात आले असून संबंधित क्षेत्रातील मतदारांना प्रारूप मतदार यादी तपासण्यासाठी व आवश्यक दावे-हरकती दाखल करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी यांचे मतदारांना आवाहनमतदार यादी अचूक, पारदर्शक व सर्वसमावेशक असणे ही मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेची मूलभूत आवश्यकता आहे. परभणी जिल्ह्यातील प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत राहणे तसेच अपात्र नोंदींची नियमानुसार पडताळणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी व BLA यांनी प्रारूप मतदार यादीचे सूक्ष्म परीक्षण करावे. पात्र मतदारांचे नाव समाविष्ट करण्यासाठी तसेच चुकीच्या नोंदींबाबत विहित पद्धतीने दावे व हरकती दाखल करण्यासाठी मतदारांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.तसेच जिल्ह्यातील सर्व मतदारांनी स्वतःचे नाव, पत्ता, मतदान केंद्र आणि इतर तपशील तपासून आवश्यक असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी दावे अथवा हरकती दाखल कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post Views: 1,492
Please Share
Previous Post

पत्रकारितेत तंत्रज्ञानाची कास धरा : गगन महोत्रा

Next Post

सुरेश तांबोळी यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सुरेश तांबोळी यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात

सुरेश तांबोळी यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ