भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखेत ७० वा वर्धापन दिन उत्साहात
सेलू, दि.१ : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखेत ७० वा वर्धापन दिन व विमा सप्ताह उद्घाटन सोहळा उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी वरिष्ठ शाखा प्रबंधक संतोष कोडगिरकर होते, तर बाजार समिती सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
विकास अधिकारी उपेंद्र बेल्लुरकर यांनी कॉर्पोरेट प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी शमशोदिन शेख, नामदेव मुंडे व उपेंद्र बेल्लुरकर यांचा सत्कार झाला. १ ते ७ सप्टेंबर दरम्यान शाळा भेट, निबंध स्पर्धा, वृक्षारोपण व ४ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर होणार आहे. कार्यक्रमात डॉ. संजय रोडगे, संतोष कोडगिरकर, उपेंद्र बेल्लुरकर, संपत कपाळे व डॉ. अनिल शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक भास्कर हिप्परगे, सूत्रसंचालन डॉ. विद्यासागर बैनाडे आणि आभार प्रदर्शन सचिन शिर्के यांनी केले.
यावेळी प्रभाकर भांडवले, शिवाजी अघाव, जाकेर शेख, रामा धोतरे, मनोहर भानुसे, अक्षय जोशी, प्रियांका धवन, प्रदीप कानकाटे, शिशांत काळे, भालचंद्र बरडे, मन्मथ देवडे, वेदांत सासवडे, राजकुमार नाईकवाडे, भारत डख, संजय मुंडे, शंभू काकडे, साहेबराव राठोड, श्रीकांत वाकडीकर, प्रकाश रोडगे, संजय मनियार, आशिष शहाणे, वसंत डख, कैलास गजमल, प्रल्हाद जाधव, बाबासाहेब जगदाळे, शंकर जिवने, संदीप जाधव, सुरेंद्र सराफ, अमीर शेख, बबन झोल यांच्यासह कर्मचारी, विकास अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.





