देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पुनरिक्षण मोहिमेत परभणीची उल्लेखनीय कामगिरी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 4, 2026
in परभणी
0
पुनरिक्षण मोहिमेत परभणीची उल्लेखनीय कामगिरी
Please Share

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून कौतुक

परभणी : विशेष सखोल पुनरिक्षण -२०२६ (एसआयआर) अंतर्गत राज्यात परभणी जिल्ह्याचे काम अतिशय उल्लेखनीय झाले आहे. याबद्दल स्वत: महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी कौतुक केले. दरम्यान, पुढील टप्प्यात करण्यात येणारी महत्त्वाची कामेही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक दक्षतेने व अचूक पध्दतीने करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात केली.

दावे व हरकती तसेच नो मॅपिंग, अनोमली प्रकरातील मतदारांच्या सुनावणी कागद पडताळणीबाबत शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, संगीता चव्हाण, शैलेश लाहोटी, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भोन्सीकर यांच्यासह मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणातंर्गत पुढील टप्प्यातील काम हे अतिशय जबाबदारीचे आहे. याबाबत भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करावे. प्राप्त दावे व हरकती सुनावणी घेण्याबाबतची कार्यपध्दती समजून घ्यावी. अंतिम मतदार यादी पारदर्शक व अचूक असेल याची दक्षता घ्यावी. प्रत्येक पात्र मतदाराची मतदार यादीत नोंद होईल आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार आहे, याची काळजी घ्यावी. यावेळी श्रीमती संगेवार यांनी विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणातंर्गत सादरीकरणाव्दारे सविस्तर मार्गदर्शन केले.

मतदारांनो, प्रारूप यादीत नावे तपासून घ्या

विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणातंर्गत परभणी जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. मतदारांना प्रारूप यादीत आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. काही त्रुटी असल्यास किंवा पात्र असूनही नाव समाविष्ट नसल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत विहित नमुन्यात दावे व हरकती दाखल करता येणार आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत.अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिध्द केली जाणार आहे, अशी माहिती दिली.फोटो…संजयसिंह चव्हाण जिल्हाधिकारी, परभणी***

Post Views: 1,471
Please Share
Previous Post

सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

Next Post

वाशिम पोलिसांची दमदार कामगिरी; ४८ तासांत फसवणुकीचा गुन्हा उघडकीस

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वाशिम पोलिसांची दमदार कामगिरी

वाशिम पोलिसांची दमदार कामगिरी; ४८ तासांत फसवणुकीचा गुन्हा उघडकीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ