देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

भाजपतील सत्तेच्या दलालांना जागा दाखवा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 22, 2025
in परभणी, मराठवाडा
0
भाजपतील सत्तेच्या दलालांना जागा दाखवा
Please Share

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे सेलूतील सभेत आवाहन, भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका, काँग्रेस आघाडीला विजयी करण्याची साद

परभणी : नगरपालिका निवडणूक ही संस्कृती विरुद्ध भाजपाच्या भ्रष्टाचारी विकृतीची लढाई आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपने सत्तेच्या दलालांना उमेदवारी दिली असून अशा प्रवृत्तीला मतदारांनी योग्य जागा दाखवावी, आणि सेलू नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेस आणि आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सेलूत झालेल्या सभेत केले.
काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व मित्रपक्षांच्या प्रचारार्थ शनिवारी दुपारी चार वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर झालेल्या सभेत सपकाळ बोलत होते. या वेळी माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार सुरेशराव देशमुख, तालुकाध्यक्ष हेमंतराव आडळकर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार आत्माराम साळवे, सिद्धार्थ हत्तीअंबरे, डॉ.सरताज, नदीम इमानदार, पवन आडळकर, नागसेन भेरजे, सुधाकर रोकडे, रणजित गजमल, आप्पा डख, तसेच पदाधिकारी आणि आघाडीतील नगरसेवक उमेदवार उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवा भारत घडवण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईसाठी सर्वांनी तयार राहावे. भाजपचे ‘पैसा फेक तमाशा देख’ धोरण देशाला खाईकडे नेत असून जातीय आणि सामाजिक फूट पाडण्याचा खेळ सुरू आहे. महाराष्ट्राचे नुकसान करणाऱ्या या राजकारणाचा धिक्कार केला पाहिजे, असे ते म्हणाले.
सेलू नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असून त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘विकासनामा’ प्रकाशित करण्यात आला. प्रास्ताविकातून आडळकर यांनी कॉंग्रेस आघाडीची भूमिका स्पष्ट केली. विविध मान्यवरांनी मनोगतांमधून स्थानिक भाजप व दलबदलू प्रस्थापित नेतृत्व प्रवृत्तीवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. सूत्रसंचालन परवेज सौदागर यांनी केले, तर आभार मिलिंद पवार यांनी मानले. नागरिकांसह महिलांची उपस्थिती होती.

Post Views: 1,534
Please Share
Previous Post

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र उत्साहात

Next Post

सपकाळ यांच्या वक्तव्याचा सेलू भाजपाकडून निषेध

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सपकाळ यांच्या वक्तव्याचा सेलू भाजपाकडून निषेध

सपकाळ यांच्या वक्तव्याचा सेलू भाजपाकडून निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ