देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिक्षणातून आत्मभान जागृत व्हावे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 23, 2025
in परभणी, महाराष्ट्र, शेक्षणिक, सामाजिक
0
शिक्षणातून आत्मभान जागृत व्हावे
Please Share

शिक्षणातून आत्मभान जागृत व्हावे

पद्मश्री डॉ.अभय बंग यांचे मत, श्रीरामजी भांगडिया व्याख्यानमालेचे सुवर्णमहोत्सवी पुष्प उत्साहात

सेलू जि.परभणी : जीवनाच्या प्रवाहात पोहायला शिकवणारे, समस्या सोडवत, आव्हानांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखावे आणि त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, याविषयीचे आत्मभान शिक्षणातून जागृत व्हावे, असे मत पद्मश्री, महाराष्ट्रभूषण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केले.

सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित कै. श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे सुवर्णमहोत्सवी पुष्प शनिवारी, २३ ऑगस्ट रोजी डॉ. अभय बंग यांनी गुंफले. “वेगळे शिक्षण शक्य आहे का?” हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी, व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी उपस्थित होते.डॉ. बंग म्हणाले, “आजच्या काळात शिक्षणाचा भार आणि तणाव झपाट्याने वाढतो आहे. बेरोजगारीचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. श्रमाप्रती उदासीन तरुणाई आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात दिसते. शिक्षणाचा जीवनाशी संबंध उरलेला नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. म्हणूनच आजच्या पिढीला जीवनातील जबाबदारीची जाणीव देणारे, प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणारे कृतिशील शिक्षण महत्त्वाचे आहे.”

यावेळी पुरस्कारप्राप्त माजी विद्यार्थी उद्योजक महेश व वसुधा खारकर, रामेश्वर व किरण राठी, गायक यशवंत व सुरेखा चारठाणकर आणि मुद्रा जीवनगौरव पुरस्कारप्राप्त सतीश व ज्योती कुलकर्णी यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन डॉ.अभय बंग यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सच्चिदानंद डाखोरे व विद्यार्थ्यांनी “या हातांनी रूजवू बीजे, सांगू मातीला…” हे शिक्षक अशोक लिंबेकर रचित गीत सादर केले. या प्रसंगी विद्यार्थिनी सिद्धी सुवर्णकार हिने रेखाटलेले चित्र डॉ.बंग यांना भेट देण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुभाष बिराजदार आणि बाबासाहेब हेलसकर यांनी केले, तर अशोक लिंबेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास साहित्यिक आसाराम लोमटे, संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे यांच्यासह परभणी, जिंतूर, मानवत, माजलगाव, मंठा, परतूर, सेलू शहरातील मान्यवर, नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,332
Please Share
Previous Post

परभणी फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

Next Post

परभणीतील पाच महिलांनी सर केले कळसुबाई शिखर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीतील पाच महिलांनी सर केले कळसुबाई शिखर

परभणीतील पाच महिलांनी सर केले कळसुबाई शिखर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ