देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘गाव व्हावे आनंदाचे डोह’ चळवळ सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 6, 2026
in परभणी
0
‘गाव व्हावे आनंदाचे डोह’ चळवळ सुरू
Please Share

पडेगावात शिक्षक दिनी गुरुगौरव सोहळा; मान्यवरांची उपस्थिती

संस्कार आणि कष्टाची सवयच माणसाला मोठे बनवते : डॉ.विठ्ठल लहाने

परभणी : गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे शिक्षक दिनानिमित्त संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या वतीने शनिवारी, पाच सप्टेंबर रोजी आयोजित ‘गुरुगौरव सोहळा’ उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण करून ‘गाव व्हावे आनंदाचे डोह’ लोकचळवळीचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी नानासाहेब कदम होते. प्रमुख व्याख्याते म्हणून प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने उपस्थित होते. व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, सत्कारमूर्ती प्रा. विठ्ठल कांगणे, नितीन लोहट, माणिक जव्हार, अभिनेते गोपी मुंढे, उदय देशपांडे, उषाताई नितीन लोहट, डॉ. अंजली गणेश निरस, पोलीस निरीक्षक महेश लांडगे, पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे व शिवाजीराव बोबडे यांची उपस्थिती होती.व्याख्यानात डॉ. लहाने म्हणाले की, संस्कार आणि कष्टाची सवयच माणसाला मोठे बनवते. आई-वडील व शिक्षक हेच आयुष्याचे खरे प्रेरणास्थान असून अपयशावर मात करण्याची ताकद कष्टातूनच मिळते. तानाजी चिखले यांनी गावच्या जडणघडणीत सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. सत्कारमूर्ती नितीन लोहट यांनी गावाच्या समृद्धीचा मार्ग शाळेतून जात असल्याचे सांगितले. प्रा. विठ्ठल कांगणे यांनी बालपण जपत श्रमदान व सहभागातून शाळा आणि गावाचा विकास साधण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात नानासाहेब कदम यांनी मतभेद विसरून ‘गाव तेथे अभ्यासिका, क्रीडांगण व आदर्श शाळा’ उभारण्याचा आणि ‘एक गाव एक स्मशानभूमी अभियान’ राबवण्याचा संदेश दिला.प्रास्ताविक श्यामसुंदर निरस यांनी केले. सूत्रसंचालन साहेबराव शिंदे परळगव्हाणकर यांनी तर आभार प्रदर्शन वाल्मीक दगडे यांनी केले. याप्रसंगी गावातील विविध उपक्रमांची डॉक्युमेंटरीही दाखवण्यात आली.

Post Views: 1,429
Please Share
Previous Post

पावसासाठी महिलांची कावड यात्रा

Next Post

शहापूर जि.प. प्राथमिक शाळेत शिक्षकदिन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post

शहापूर जि.प. प्राथमिक शाळेत शिक्षकदिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ