देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

जगणे शोषितांचे तुम्हीच बदलले सारे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 11, 2026
in परभणी
0
जगणे शोषितांचे तुम्हीच बदलले सारे
Please Share

परभणीत त्रैभाषिक कवी संमेलनातून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

परभणी : येथील सर्वधर्मीय फुले शाहू- आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने १० एप्रिल रोजी आयोजित त्रैभाषिक कवी संमेलनातून क्रांतीबा ज्योतीबा फुले यांना आगळेवेगळे अभिवादन करण्यात आले. जगणे शोषितांचे तुम्हीच बदलले सारे, आता त्यांच्या मुठीत सूर्य चंद्र तारे… या शब्दांत महोत्सवाचे निमंत्रक यशवंत मकरंद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या कवी संमेलनाचे अध्यक्ष इंजि. डॉ. विवेक जनार्दन मवाडे यांनी ‘मुडदे’ या कवितेतून ” मुडदे असतात आपल्या आजूबाजूला… शहरात, गावात आणि घरात सुद्धा, ” अशा शब्दांत निष्क्रिय आयुष्य जगणाऱ्यांवर आसूड ओढले. तसेच मेरा हिंदुस्तान प्यारा हिंदुस्तान, कितनी उल्फत यहा… कितनी शरफत यहा… या ओळींतून देशातील कर्तृत्ववान लोकांचा सन्मान केला. सविता वडगावकर यांनी फुले, शाहू, आंबेडकरांनी समाजात क्रांती घडवली आणि त्यांच्या प्रेरणेतून विचारांची ज्योती उजळली, अशा भावना मांडल्या. संतोष नारायण यांनी द्रोणाचार्यच भेटले पदोपदी हर जागी, एकलव्यावानी मग मीच माझा गुरु झालो, ही कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.रात्री १२ वाजेपर्यंत रंगलेल्या या संमेलनात ज्येष्ठ कवी प्रेमानंद बनसोडे, एम. एम. भरणे, दि. क. लोंढे, दुर्गानंद वाळवंटे, प्रा. अंजली धुतमाल, अनिताताई सरोदे, त्रिवेणी पाटील, सौ. ज्योती देशमुख, प्रा. शंकर कदम, प्रा. शिवाजी कांबळे, संजय बगाटे, विश्वनाथ झोडपे, रामचंद्र रोडे, डॉ. मुंजाजी इंगोले, एम. एम. बरे, विश्वजित वाघमारे, डॉ. मुनीब हनफी, मुसैब ऊर रहमान, अंसारी जावेद आणि माविया अब्दुल कलाम या कवींनी आपल्या दर्जेदार रचना सादर केल्या.कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भास्कर गायकवाड यांनी केले. प्रारंभी महोत्सव समितीचे अध्यक्ष समीर दुधगावकर, डॉ. सुरेश हिवराळे, एन. आय. काळे, अनिता सरोदे, यशवंत मकरंद, प्रा. डॉ. सुरेश शेळके, त्र्यंबक वडसकर, रवी पुराणिक, संजीव आढागले, ॲड. अफजल बेग, रवी पंडित व संजय आडोदे यांनी क्रांतीबा ज्योतीबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विश्वजित वाघमारे, विनय मकरंद, सिद्धांत सूर्यवंशी, आनंद सारणीकर आदींनी परिश्रम घेतले. ११ एप्रिल रोजी समितीच्या वतीने क्रांतीबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

Post Views: 1,428
Please Share
Previous Post

गणेश माळवे यांची पर्यवेक्षकपदी नियुक्ती

Next Post

श्रीकेशवराज बाबासाहेब महाराजांचे चरित्र सर्वांनी वाचावे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्रीकेशवराज बाबासाहेब महाराजांचे चरित्र सर्वांनी वाचावे

श्रीकेशवराज बाबासाहेब महाराजांचे चरित्र सर्वांनी वाचावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ