देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

श्रीकेशवराज बाबासाहेब महाराजांचे चरित्र सर्वांनी वाचावे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 13, 2026
in मराठवाडा
0
श्रीकेशवराज बाबासाहेब महाराजांचे चरित्र सर्वांनी वाचावे
Please Share

हभप प्रणव महाराज पटवारी यांचे आवाहन, अनुराधा सुभेदार लिखित ओवीबद्ध चरित्राचे गद्य रूपांतराचे प्रकाशन

सेलू : शिर्डीच्या साईबाबांचे सद्गुरू तथा शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या चरित्राचे गद्य रूपांतर पुस्तक प्रकाशन सोहळा, ११ एप्रिल रोजी सायंकाळी श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरातील सभागृहात थाटात संपन्न झाला.

केशवराज बाबासाहेब महाराज यांचे वंशज अनुराधा प्रभाकर सुभेदार यांनी बाबासाहेब महाराजांच्या ओवीबद्ध असलेल्या ग्रंथाचे गद्य रुपात रूपांतर केलेल्या ग्रंथाघे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर येथील जेष्ठ पत्रकार तथा लेखक शरद देऊळगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजलगाव येथील ह.भ.प.प्रणव पटवारी हे उपस्थित होते.

व्यासपीठावर लेखिका अनुराधा प्रभाकर सुभेदार,श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचे वंशज तथा श्री के बा शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष ऍड. एल.एम.सुभेदार, डॉ.सुधाकरराव सुभेदार आदींची उपस्थिती होती. श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी ग्रंथाच्या लेखिका अनुराधा प्रभाकर सुभेदार म्हणाल्या की, संतश्रेष्ठ दासगणू महाराजांनी श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांचे जे चरित्र ओविरुपात लिहिले त्यातून प्रेरणा घेऊनच मी हे गद्य रूपांतर केले आहे. श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचे कार्य सर्वांना माहीतच आहे. परंतु त्यांचे कार्य आणखी प्रभावीपणे भविकांसमोर यावे या उद्देशाने व केशवराज बाबासाहेबांच्या आशीर्वादानेच हे मोठे कार्य सिद्धीला गेले आहे. सुभेदार घराण्याचा इतिहास खूप मोठा आहे. हाच इतिहास सुभेदार घराण्याच्या नवीन पिढीला व सामान्य जनतेला देखील कळावा या उद्देशाने या गद्य रूपातील चरित्राचे लिखाण केले आहे. यावेळी सुभेदार परिवाराच्या वतीने सारिका कुलकर्णी व श्वेता स्वप्नील सुभेदार यांनी बाबासाहेब मंदिर संस्थानसाठी पेटी वादनासाठी १५ हजार रुपये देणगी आणि स्नेहल श्रीमंत यांनी बिछायत खरेदीसाठी ७५०० असे एकूण बावीस हजार पाचशे रुपये देणगी पुजारी सुधीर मंडलिक यांच्याकडे सुपूर्द केली.

प्रमुख पाहुणे प्रणव पटवारी म्हणाले की, अनुराधा सुभेदार यांनी श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचे चरित्र सुलभ पद्धतीने लिहिले आहे. भगवंताच्या चरित्रापेक्षा संतांचे चरित्र अत्यंत जवळचे असते. या ग्रंथातून महाराजांचे चरित्र समाजाला समजेल. यावेळी पटवारी यांनी श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचे चरित्र सविस्तर सांगितले. केशवराज बाबासाहेब महाराज व संत साईबाबा यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून हे चरित्र सर्वांनी वाचावे असे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपात शरद देऊळगावकर म्हणाले की, बाबासाहेब महाराजांच्या मंदिरात माझ्यावर बाल संस्कार झालेले आहेत. मंदिरातील नुसत्या सहवासाने जीवन कृतार्थ झाले आहे. हा ग्रंथ मी सुद्धा लिहू शकत होतो परंतु बाबासाहेब महाराजांच्या वंशजांनी हे पुस्तक लिहावं असे मनातून वाटले म्हणून अनुराधा सुभेदार यांना प्रेरित केले. आणि सुभेदार परिवारातील नवीन पिढीलाही आपला उज्वल इतिहास समजावा व भाविकांना समजावा ही भूमिका या ग्रंथ निर्मितीमागे आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रास्ताविक सारिका कुलकर्णी यांनी केले. डॉ सुधाकर सुभेदार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ह.भ.प.संजय पिंपळगावकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभय सुभेदार, स्वप्नील सुभेदार, प्रवीण माणकेश्वर, अजित मंडलिक, मोहन खापरखुंटीकर, श्रीराम जाजू व मित्र परिवार, नारायण चौधरी, मृदंगचार्य विठ्ठल महाराज काळे, अण्णासाहेब गायकवाड, बाबासाहेब बदाले, श्याम मुंडे आदींनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,750
Please Share
Previous Post

जगणे शोषितांचे तुम्हीच बदलले सारे

Next Post

“बहुरंगी फुले” कथासंग्रहाचे प्रकाशन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
“बहुरंगी फुले” कथासंग्रहाचे प्रकाशन

"बहुरंगी फुले" कथासंग्रहाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ