देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महाभारत संदेश कथेला अलोट गर्दी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 12, 2026
in परभणी
0
महाभारत संदेश कथेला अलोट गर्दी
Please Share

सेलूमध्ये फिरता ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्यास प्रारंभ

स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांच्या अमृतवाणीत भाविक दंग

सेलू जि.परभणी : सेलू येथील अलंकापुरीनगरीत गुरुवारपासून (१२ मार्च) फिरता ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्याला अभूतपूर्व उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्ताने आयोजित राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांच्या महाभारत संदेश कथा श्रवणाला पहिल्याच दिवशी भाविकांनी अलोट गर्दी केली.

प्रारंभी कथेचे यजमान बिहाणी परिवाराच्या वतीने संत, सद्गुरू आणि ग्रंथ पूजन झाले. यावेळी सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी, जयप्रकाश बिहाणी, किरण बिहाणी, नामदेव महाराज ढवळे, रामनाना पाटील, माधुरी पाटील, नारायण मुसळे, गजानन आघाव, डॉ. आशिष डख, अशोक पटवारी, कचरू शेरे, ओमप्रकाश मेहता, पारस काला यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वामीजी म्हणाले की, महाभारत हा केवळ ग्रंथ नसून तो मानवी संस्कृतीचा महान ज्ञानकोश आहे. भगवान वेदव्यासांच्या वचनानुसार, जो आपल्या घरात हा ग्रंथ आदराने ठेवेल, त्याला सर्वत्र यश प्राप्त होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांनी बालपणी यातील कथा ऐकल्या होत्या, ज्याचा त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला. जगातील प्रत्येक समस्येचे उत्तर गीतेमध्ये दडलेले असून मनातील संभ्रम, भीती आणि दुःख यावर मात करण्यासाठी गीता ही प्रत्यक्ष जगण्यासाठी आहे.
भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचे कारण सांगताना त्यांनी संस्कृतीचे १६ स्तंभ विशद केले. यामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे ४ पुरुषार्थ; ४ आश्रम; ४ वर्ण आणि ४ साधना मार्गांचा समावेश आहे. प्रास्ताविक पंडित महाराज डाके यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. संजय पिंपळगावकर यांनी केले. या सोहळ्याला सेलू शहरासह पंचक्रोशीतील भाविकांनी अलोट गर्दी केली आहे.

जीवनात पत्नीचे स्थान श्रेष्ठ

शकुंतला आणि दुष्यंत राजाच्या प्रसंगातून सत्याचा विजय आणि कौटुंबिक जबाबदारीचे महत्त्व विशद करताना राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज म्हणाले की, मानवी जीवनात पत्नीचे स्थान श्रेष्ठ असून ती संसाराचा मुख्य आधारस्तंभ आहे. मानवाचा सर्वात उत्तम मित्र म्हणजे त्याची पत्नीच असते. धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ साध्य करण्यासाठी पत्नीची खंबीर साथ आवश्यक आहे. ती संसाराची नौका असून आजारपणात मातेप्रमाणे सेवा करते.

Post Views: 1,795
Please Share
Previous Post

‘ज्ञानोबा-तुकाराम’ जयघोषाने सेलूनगरी दुमदुमली

Next Post

महाभारत संदेश कथेला अलोट गर्दी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महाभारत संदेश कथेला अलोट गर्दी

महाभारत संदेश कथेला अलोट गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ