देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘ज्ञानोबा-तुकाराम’ जयघोषाने सेलूनगरी दुमदुमली

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 11, 2026
in परभणी
0
..................... DESHNISHTH https://chat.whatsapp.com/JYZqD00i34UE9pf4sklzYk?mode=ac_t
Please Share

अभूतपूर्व उत्साहात फिरता ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्यास प्रारंभ, ग्रंथदिंडी, शोभायात्रेवर जागोजागी पुष्पवृष्टी, भक्तीमय वातावरण

सेलू (अलंकापुरीनगरी) : शिर्डीचे संत साईबाबा यांचे सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या पावन नगरीत बुधवारी, ११ मार्चपासून सेलू येथील सातोना रोडवरील अलंकापुरीनगरीत फिरता ज्ञानेश्वरी महापारायण सांगता सोहळ्याला अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजता श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून निघालेल्या भव्य ग्रंथदिंडीने आणि ‘ ज्ञानोबा-तुकाराम’ जयघोषाने अवघी सेलूनगरी दुमदुमून गेली. सारेजण भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले.

या दिंडीत रथ, तुकारामांचे अश्व आणि परभणी, जालना, बीड, वाशिम पुणे जिल्ह्यासह पंचक्रोशीतील १० हजारांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेवर जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात आली. दिंडीमध्ये सहभागी ७५० पताकाधारी वारकरी, ७५० कलशधारी, तुळशीधारी व वृक्षधारी महिला आणि विविध शाळांमधील लेझीम पथकांनी लक्ष वेधून घेतले. दिंडीत संत, महंत आणि मान्यवर सहभागी झाले होते. विशेष म्हणजे ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी नाव असलेल्या व्यक्तींचा यात विशेष सहभाग होता. मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती, तर विविध गावांतील ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी फराळ व पाण्याची सोय केली होती. या सोहळ्यात राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची श्री महाभारत संदेश कथा १२ ते १९ मार्च दरम्यान दुपारी २ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आली. याशिवाय दररोज सकाळी व रात्री नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सातोना रोडवरील २० एकर परिसरात उभारण्यात आलेल्या अलंकापुरीनगरीत या सोहळ्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून, संपूर्ण नियोजन प्लास्टिकमुक्त आहे. भोजनासाठी शेतकऱ्यांनी दान केलेल्या २ लाख केळीच्या पानांचा वापर केला जात आहे. शहरातील रिक्षा चालकांनीही केवळ १० रुपयांत प्रवासाची सोय देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. पंडित महाराज डाके यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी प्रचारक आणि विविध क्षेत्रातील भाविकांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या सोहळ्यामुळे सेलूत भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

Post Views: 1,589
Please Share
Previous Post

स्मार्ट मीटरसाठी कंत्राटदारांचा दबाव

Next Post

महाभारत संदेश कथेला अलोट गर्दी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महाभारत संदेश कथेला अलोट गर्दी

महाभारत संदेश कथेला अलोट गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ