देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ आंदोलन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 24, 2026
in परभणी
0
दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ आंदोलन
Please Share

जिंतूर, सेलूमध्ये जोरदार निदर्शने

परभणी : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी, २३ जुलै २०२६ जिंतूर शहरात वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात एकत्र येत आंदोलन केले. व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. यास संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, सेलू येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

जिंतूर येथे आंदोलकांनी तहसीलदार शीतल कच्छवे यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन दिले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, विद्यार्थी व विद्यार्थिनींवर लाठीचार्ज करणाऱ्या तसेच गणवेशाविना कारवाई करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी, नीट पेपरफुटी प्रकरणामुळे बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सतीश वाकळे, शरद चव्हाण, विकास मोरे, गंगाप्रसाद घुगे, बालाजी शिंदे, शेख इर्शाद पाशा, यांच्यासह नगरसेवक शेख इस्माईल, अकबर कुरेशी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. दरम्यान, पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सेलूत माकपची निदर्शने

परभणी : दिल्ली येथील जंतर मंतरवर ‘नीट’ पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व युवकांवर २० जुलै रोजी झालेल्या अमानुषपणे लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २३ जुलै रोजी सेलू तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली.‌ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करावी आणि या आंदोलनात शहीद झालेल्यांच्या कुटुंबांना १ कोटी रुपये भरपाई द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात कॉम्रेड रामेश्वर पौळ, सुभाष शहाणे, रोहीदास हातकडके, आकाश खनपटे, ज्ञानेश्वर पौळ, विष्णू चव्हाण, विनोद धापसे आणि गौरव कारके सहभागी झाले होते.

परभणीत ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २२ जुलै रोजी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. शेतकरी आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवरील दडपशाहीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात किशोर ढगे, सय्यद कलीम, रामप्रसाद गमे, प्रसाद गरुड, माऊली शिंदे, विकास भोपळे, गजानन दुघाणे, मुंजा लोडे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.

Post Views: 1,602
Please Share
Previous Post

सर्वोच्च न्यायालयाचा शेतकऱ्यांना दिलासा

Next Post

सेलूमध्ये १०१ जणांचे रक्तदान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूमध्ये १०१ जणांचे रक्तदान

सेलूमध्ये १०१ जणांचे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

परभणी, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण...

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर कलेचे सादरीकरण, दोन फेऱ्यांमध्ये आयोजन, परभणीत २ ऑगस्ट रोजी महोत्सव परभणी : ‘इतिहास महाराष्ट्राचा...

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

विदर्भ, खानदेश आणि कोकणाला हवामान विभागाचा इशारा मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा...

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

दलित आघाडीचे अमित भालेराव यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश परभणी, दि.२८ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ