देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नामाने देह पुण्यवान होतो

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 12, 2026
in परभणी
0
नामाने देह पुण्यवान होतो
Please Share

नामदेव महाराज चारठाणकर यांचे प्रतिपादन

सेलू : नाम, भक्ती आणि ज्ञान या सर्वांमध्ये नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे, कारण कोणत्याही गोष्टीची सुरुवात नामातूनच होते. वेद, सृष्टीची उत्पत्ती आणि जगातील सर्व व्यवहार हे नामातूनच होत असतात, म्हणून नामाने देह पुण्यवान होतो, असे प्रतिपादन हभप नामदेव महाराज चारठाणकर यांनी केले. येथील अलंकापुरी नगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी सांगता सोहळ्यातील कीर्तनाचे पहिले पुष्प गुंफताना गुरुवार १२ मार्च रोजी सकाळी ते बोलत होते.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘पवित्र तो देह वाणी पुण्यवंत’ या अभंगावर विवेचन करताना ते म्हणाले की, नामाचे महत्त्व अगाध आहे. नामधारकाच्या पायाखालील मातीसाठी साक्षात भगवान त्यांच्या पाठीमागे चालतात, त्यामुळे नाम घेणाऱ्यांना इतर कोणत्याही साधनेची गरज उरत नाही. नामानेच ईश्वराची प्राप्ती होते. ज्यांच्या हृदयात अखंड भगवंताचे नाम आहे, तो देह तीर्थस्वरूप असून त्याची वाणी पुण्यवान समजावी. नामाचे चिंतन केल्याने सर्व दोष नष्ट होतात. ज्ञानोबा तुकाराम हा मंत्र सर्व साधनांचे सार असून, देवाचे नाव घेतल्याने अंत:करण शुद्ध होते आणि संतांचे दर्शन घडते, असे हभप नामदेव महाराज चारठाणकर यांनी स्पष्ट केले.

शहरातील अलंकापुरी नगरीत पंडित महाराज डाके यांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महाभारत आणि ज्ञानेश्वरीचा समन्वय सांगताना हभप चारठाणकर महाराज म्हणाले की, महाभारत जर आंब्याचे झाड असेल, तर ज्ञानेश्वरी त्यातील मधुर रस आहे. हा ज्ञानामृत रस गावागावात पोहोचवण्याचे हभप पंडित महाराज डाके यांचे कार्य अत्यंत मोठे आहे.

सोहळ्याच्या नियोजनाबद्दल बोलताना त्यांनी एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीचा आधार घेत भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांची सोय व्हावी यासाठी सर्वांनी सेवाकार्यात खारीचा वाटा उचलावा, असे ते म्हणाले. या सोहळ्यातील कीर्तनाची पहिली सेवा म्हणजे केवळ पत्रावळ असून, यापुढील प्रत्येक कार्यक्रम म्हणजे ज्ञानाचे पक्वान्न असणार आहे, असे सांगत त्यांनी आपल्या रसाळ वाणीने भाविकांना मंत्रमुग्ध केले.

Post Views: 1,659
Please Share
Previous Post

महाभारत संदेश कथेला अलोट गर्दी

Next Post

गॅस सिलिंडरसाठी नियंत्रण कक्ष

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
गॅस सिलिंडरसाठी नियंत्रण कक्ष

गॅस सिलिंडरसाठी नियंत्रण कक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ