देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूच्या नूतन कन्या प्रशालेत गुणवंतांचा गौरव

admin by admin
August 1, 2025
in परभणी
0
सेलूच्या नूतन कन्या प्रशालेत गुणवंतांचा गौरव
Please Share

यशासाठी प्रयत्नशील राहा : डॉ.मधुरा आनंदगावकर

सेलू : विद्यार्थिनींनी यशाची शिखरे गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे, मेहनत घ्यावी आणि प्रशालेचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन डॉ. मधुरा (अष्टूरकर) आनंदगावकर यांनी केले. सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेद्वारे संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेचा वर्धापन दिन शुक्रवारी, १ ऑगस्टरोजी उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने गुणवंत विद्यार्थिनी सत्कार सोहळ्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, दत्तराव पावडे, राजेशजी गुप्ता, अझीझखॉं पठाण, माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा भारती खंदारे,  मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, पर्यवेक्षक दत्तराव घोगरे व भालचंद्र गांजापुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात लेझीम पथकाच्या सादरीकरणाने झाली. दीपप्रज्वलन आणि माता सरस्वती, बाळ गंगाधर टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमापूजनाने सोहळ्याचा प्रारंभ झाला. पूजा महाजन व विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते प्रशालेच्या दैनंदिनीचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थिनी अनया ढाकणे, सिद्धी पवार आणि हर्षदा मोगल यांनी महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

सतीश कुंडीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. मधुरा आनंदगावकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. प्रशालेतील सर्व गुणवंत विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले, तर दत्तराव घोगरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सेलूच्या नूतन कन्या प्रशालेत गुणवंतांचा गौरव

Post Views: 1,077
Please Share
Previous Post

आमदार विटेकर यांची साईबाबा बँकेच्या मानवत शाखेला भेट

Next Post

लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

admin

admin

Next Post
लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन परभणी : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सेलू शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम झाला. या वेळी पालकमंत्र्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पालकमंत्री बोर्डीकर यांनी शहरातील लोकमान्य टिळक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सेलू येथील लहुजी साळवे कर्मचारी महासंघ, तालुका शाखेतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड अशोक उफाडे, दीपक चव्हाण, राजेंद्र पाटोळे, आबासाहेब लोंढे, डॉ. सुरेश हिवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सेलू येथील नूतन विद्यालयात शुक्रवारी सान्वी शितळे, चिन्मय कुलकर्णी, आर्या कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. प्रभारी मुख्याध्यापक किरण देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ