देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू् तालुक्यात ९७ जणांचे अर्ज वैध

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 22, 2026
in परभणी
0
परभणी जिल्ह्यात १,२२२ जणांचे अर्ज वैध
Please Share

सायंकाळी उशिरापर्यंत आक्षेपावर सुनावणी

सेलू | प्रतिनिधी : परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात आगामी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रात्री साडे आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जिल्हा परिषदेच्या पाच गटातील निवडणुकीसाठी ३१, तर पंचायत समितीच्या १० गणातील निवडणुकीसाठी ६६ असे एकूण ९७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, वैध-अवैध उमेदवारांची यादी निवडणूक विभागाकडून प्रसिद्धी माध्यमांना रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही.

आकडेवारीवरून सेलू तालुक्यातील विविध मतदारसंघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद गटांच्या स्थितीनुसार, चिकलठाणा (बु.), वालूर, कुपटा, रवळगाव आणि देऊळगाव गात या पाच गटांमध्ये एकूण ३१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये १२ पुरूष आणि १९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. चिकलठाणा गटात ६, वालूरमध्ये ५, कुपटा येथे ९, रवळगावमध्ये ४ आणि देऊळगाव गात गटामध्ये ७ वैध उमेदवारांची नोंद करण्यात आली आहे.
दुसरीकडे, पंचायत समितीच्या १० गणांमध्ये देखील उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. चिकलठाणा, रवळगाव, मोरेगाव, बोरकिनी, वालूर, कुपटा, सोन्ना, डासाळा, देऊळगाव गात आणि तिडी पिंपळगाव या गणांमध्ये मिळून एकूण ६६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये ३६ पुरुष आणि ३० महिला उमेदवारांनी निवडणूक रिंगणात आपले स्थान निश्चित केले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २७ जानेवारी २०२६ आणि याच दिवशी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शोभादेवी जाधव आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.शिवाजी मगर यांनी कळविली आहे.

Post Views: 1,812
Please Share
Previous Post

सेलू तालुका : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निश्चित

Next Post

कत्तलखान्यावर सेलू पोलिसांचा छापा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कत्तलखान्यावर सेलू पोलिसांचा छापा

कत्तलखान्यावर सेलू पोलिसांचा छापा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ