देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शेतकऱ्यांनी घेतली बच्चू कडू यांची भेट

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 30, 2025
in परभणी
0
शेतकऱ्यांनी घेतली बच्चू कडू यांची भेट
Please Share

समृद्धी महामार्ग भूसंपादनाची प्रक्रिया थांबवण्याची बच्चू कडू यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

परभणी : नांदेड-जालना समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी, अमरावती येथे माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडत, प्रशासनाकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.

परभणी जिल्ह्यातील सेलू आणि जिंतूर तालुक्यातील शेतकरी, जमिनीला मिळणाऱ्या अत्यल्प मोबदल्यामुळे नाराज आहेत. सेलू तालुक्यातील जवळा जिवाजी, चिकलठाणा खुर्द, चिकलठाणा बुद्रुक, रायपूर, वालूर, हातनुर, गुळखंड, तांदुळवाडी, हट्टा आणि जिंतूर तालुक्यातील मारवाडी या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन योग्य दरात होत नसल्याची तक्रार त्यांनी केली. या अन्यायाविरोधात शेतकरी सेलू उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असतानाही, प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे शिष्टमंडळाने बच्चू कडू यांना सांगितले

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी तत्काळ परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आणि औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेचा निर्णय होईपर्यंत भूसंपादनाची पुढील कोणतीही प्रक्रिया न राबवण्याची स्पष्ट सूचना दिली.
या शिष्टमंडळात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, तसेच प्रशांत नाईक, रमेश माने, निशांत मुंढे, विजय खरात आणि राजेश मोहिते आदींचा समावेश होता.

Post Views: 1,186
Please Share
Previous Post

अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक इतिहास जिवंत केला

Next Post

अनाधिकृत मोबाईल टॉवरला तीव्र विरोध

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अनाधिकृत मोबाईल टॉवरला तीव्र विरोध

अनाधिकृत मोबाईल टॉवरला तीव्र विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ