देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

विद्यार्थी हेच शिक्षकांच्या यशाचा खरा आरसा – करुणा कुलकर्णी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 11, 2025
in परभणी
0
विद्यार्थी हेच शिक्षकांच्या यशाचा खरा आरसा - करुणा कुलकर्णी
Please Share

सेलू : शिक्षक दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभात बोलताना शालेय समितीच्या अध्यक्षा करुणा कुलकर्णी यांनी, विद्यार्थी हेच शिक्षकांच्या यशाचा खरा आरसा आहेत, असे प्रतिपादन केले. त्या म्हणाल्या की, विद्यार्थी जीवनात शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक हे दुसऱ्या पालकांप्रमाणे असतात आणि समाज व देश घडवणाऱ्या पिढीच्या निर्मितीमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

शिक्षक किती प्रभावीपणे शिकवतात आणि यशस्वी होतात, याची खरी पावती विद्यार्थ्यांच्या प्रगतीतून मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशातून शिक्षकांचे यश प्रतिबिंबित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर, मुख्याध्यापक शंकर शितोळे, अनिल कौसडीकर आणि शंकर राऊत उपस्थित होते. यावेळी, विद्यालयाच्या वतीने सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनीही भाषणांतून शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, मानस सरोवर यात्रा पूर्ण करून परत आलेल्या बालवाडीच्या शिक्षिका सीमा आष्टीकर यांचाही खास सत्कार करण्यात आला.

आपल्या मनोगतात कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर यांनी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापनाची गुणवत्ता वाढवावी, असे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, शिक्षक हे प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे ऊर्जास्रोत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे आणि राष्ट्र उभारणीचा पायाही शिक्षकच तयार करतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गायकवाड यांनी केले, तर पद्य गजानन साळवे यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी विजय चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post Views: 1,155
Please Share
Previous Post

प्रथमेश पवारची विभागीय तायकांदो स्पर्धेसाठी निवड

Next Post

श्री गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्री गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

श्री गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ