परभणी : तालुक्यातील ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसीचा विद्यार्थी विवेक मोतीराम कदम याने नाईपर जेईई (NIPER JEE-२०२६) या राष्ट्रीय पातळीवरील संयुक्त प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या अत्यंत आव्हानात्मक परीक्षेत त्याने संपूर्ण भारतात ३५९३ वा क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
विवेकच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के आणि संस्थेच्या सचिव प्रा. सौ. शितल सोनटक्के यांनी त्याचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे समन्वयक डी. व्ही. सुर्यवंशी, प्राचार्य डॉ. एम. डी. सलाउद्दीन, उपप्राचार्य डॉ. एन. व्ही. क्षीरसागर, विभाग प्रमुख प्रा. सौ. ए. ए. नजन, विभाग प्रमुख डॉ. पी. एन. काळे आणि ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल शिंगारे यांनीही त्याचे कौतुक केले.
अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभारणीस गती देणार
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर : मुंबईत बैठकीत आरोग्य विभागासंदर्भातील विविध प्रलंबित प्रस्तावांचा आढावा परभणी, दि. २४ : परभणी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार,...





