प्रबोधनाची ६३ वर्षांची परंपरा, व्याख्यानांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
सेलू जि.परभणी : गणेशोत्सव काळात ज्ञान, मनोरंजन आणि ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रबोधन व्हावे, या उद्देशाने सेलू (जि.परभणी) येथे गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) चार दिवसीय गणेशोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार आणि शुक्रवार ( २८ आणि २९ ऑगस्ट) तसेच बुधवार आणि गुरूवार ( ३ आणि ४ सप्टेंबर) असे चार दिवस नूतन विद्यालयाच्या कै.राजेंद्र बन्सीलालजी गिल्डा सभागृहात दररोज सायंकाळी सहा वाजता व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. व्याख्यानमालेचे हे ६४ वे वर्ष आहे.
गुरुवारी (२८ ऑगस्ट) “पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली” या विषयावर व्याख्यान आहे. पक्षी निरीक्षक माणिक पुरी आणि माधव गव्हाणे विचार मांडणार आहेत. अध्यक्षस्थान विजय ढाकणे भूषवितील. शुक्रवारी (२९ ऑगस्ट)
“पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर” या विषयावर परभणी येथील बालविद्या मंदिर हायस्कूलचे शिक्षक सुभाष ढगे विचार मांडतील. अध्यक्षस्थानी नूतन कन्या प्रशालेतील शिक्षिका संगिता खराबे असतील. बुधवारी, (३ सप्टेंबर) “महिलांना काय हवे? रक्षण की आरक्षण” या विषयावर ॲड.माधुरी क्षीरसागर ( परभणी) यांचे व्याख्यान आहे. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या सल्लागार ॲड.निलिमा कोकड (परभणी) असतील. गुरूवारी (४ सप्टेंबर) “संतवाणी – संगीत दृश्यनाटिका” हा सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कलाकार सादर करणार आहेत. अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिभाऊ लहाने, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, विनोद बोराडे, माजी जिप सभापती अशोक काकडे, राजेंद्र लहाने, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे यांची उपस्थिती राहणार आहे. यामध्ये सीमा आष्टीकर, मेघना चौधरी, गीता मुळावेकर, मीरा देशमुख, मनिषा धर्माधिकारी, शुभदा सुभेदार, पद्मजा खारकर, सरिता उमरीकर, माधवी पिंगळे, प्रज्ञा गुंडेकर, रोहिणी वाकोडकर, माधुरी चारठाणकर, स्वप्नीता ढवळे, सुलभा देशपांडे, स्वप्ना पांडव, शीतल वाकडीकर आदी कलाकार सहभागी आहेत. विविध
कार्यक्रमांचे संयोजक म्हणून उपेंद्र बेल्लूरकर, संजय विटेकर, जी.ए.गुंजकर, डॉ.सुरेश हिवाळे, डॉ.शरद ठाकर, प्रा.नागेश कान्हेकर, पौर्णिमा जोहिरे, प्रणिता सोलापुरे, मेघना चौधरी, रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर, भालचंद्र गांजापूरकर, वर्षा राजवाडीकर, मनिषा धर्माधिकारी, गंगाधर कान्हेकर आदी काम पाहात आहेत. व्याख्यानमालेस रसिक, श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष तथा नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील, चिटणीस अजित मंडलिक, कार्याध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संतोष कुलकर्णी राजेश ढगे, लता गिल्डा कोषाध्यक्ष उज्ज्वला सतीश भाला, समन्वयक डॉ.काशिनाथ पल्लेवाड, उपाध्यक्ष किशोर जोशी, प्रा.ए.डी.कुलकर्णी, अविनाश बिहाणी, प्रा.प्रभाकर रावते, डॉ.ऋतुराज साडेगावकर, बाबासाहेब हेलसकर, चंद्रशेखर नावाडे, बाबासाहेब चारठाणकर, शोभा कोरडे, जयश्री सोन्नेकर, डी.डी.सोन्नेकर, मोहम्मद इलियास, डॉ.सुरेश हिवाळे, कल्याण पवार तसेच पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे. व्याख्यानामालेच्या यशस्वीतेसाठी सेलू शहरातील सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदींसह विविध क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग आहे.





