सहभागी आंदोलकांची वाजत गाजत मिरवणूक
सेलू : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आझाद मैदान, मुंबई येथे २९ ऑगस्टपासून झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला मिळालेल्या यशाचा सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे बुधवारी, ३ सप्टेंबर रोजी जल्लोष करण्यात आला. यानिमित्ताने आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या मराठा समाज बांधवांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये नंदकिशोर खंडागळे, ज्ञानेश्वर पौळ, शाम चव्हाळ, तुकाराम मगर, गजानन मगर, सचिन आकात, सखाराम नाटकर, विनोद मगर, नामदेव सुरोसे, महादेव मगर, लक्षमण मगर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती जनार्धन मगर, उपसरपंच दिलीप मगर, विठ्ठल आकात, प्रभू चट्टे, तुकाराम नाटकर गजानन पौळ, शाम मगर, अशोक नाटकर, दिनकर मगर, जगदीश नाटकर, युवराज नाटकर, प्रफुल्ल खंडागळे, पवन मगर, ऋषिकेश मगर, योगेश काकडे, खंडू मोरे आदींसह नागरिक आणि मराठा बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.





