जिंतूर : परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषद निवडणुकीसाठी एकूण ४१,८०७ मतदारांपैकी ३०,३०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. टक्केवारी ७२.५० आहे.
पुरुषांची मतदार संख्या २१,४२० आणि महिलांची संख्या २०,३८७ इतकी आहे. सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये, एकूण ३०,३०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदार १५,९९५, महिला मतदार १४,३१३ समावेश आहे. सरासरी ७२.५०% मतदान झाले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली आहे.
स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण
डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....





