देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

आभासी ‘स्टेटस’‌ च्या चक्रयूहातून बाहेर या

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 12, 2026
in परभणी, मराठवाडा
0
आभासी 'स्टेटस'‌ च्या चक्रयूहातून बाहेर या
Please Share

पत्रकार विलास बडे यांचे प्रतिपादन : जिंतूर तालुका प्रेस क्लब आणि व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या व्याख्यानाला मोठा प्रतिसाद

जिंतूर : काबाडकष्ट करणाऱ्या आई-वडिलांचे आणि स्वतःच्या कष्टाचे ‘स्टेटस’ ठेवण्याऐवजी आजची युवा पिढी आणि विद्यार्थी आभासी ‘स्टेटस’च्या खोट्या दुनियेच्या, खर्‍या चक्रव्यूहात अडकत चालले आहेत. यातून वेळीच बाहेर पडण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पत्रकार तथा व्याख्याते विलास बडे यांनी केले.

जिंतूर तालुका प्रेस क्लबआणि व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने रविवारी, ११ जानेवारी रोजी सायंकाळी जिंतूर येथील कन्या प्रशालेच्या प्रांगणात आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. ” चक्रव्युहात अडकलेला अभिमन्यू” हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर, नगराध्यक्ष प्रताप देशमुख, मुकुंद सावजी कळमकर, पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, नायब तहसीलदार प्रशांत राखे, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे, आबासाहेब जाधव, डॉ.दुर्गादास कानडकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विनोद पाचपिल्ले, राजू गारकर, प्रशांत मुळी, प्रभाकर कुरे, शंकर जाधव यांना प्रातिनिधिक स्वरूपात १५ लाखांच्या विमा पॉलिसीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विलास बडे यांनी सांगितले की, एकीकडे शेतकरी व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकला असून प्रशासकीय त्रुटी त्यांना अडचणीत आणत आहेत, तर दुसरीकडे युवा पिढी मोबाईलच्या आभासी जगात स्वतःची स्वप्ने विसरत आहे. आई-वडिलांच्या कष्टाचा विसर पडून मोबाईल स्टेटसमध्ये वेळ घालवणाऱ्या तरुणांनी वास्तवाचे भान ठेवणे गरजेचे आहे. मोबाईलच्या आणि व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकलेला शेतकरी व तरुण हेच आजचे खरे अभिमन्यू असून, त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आणि स्वतःच्या क्षमतांचा शोध घेऊन, ईश्वराने दिलेल्या सुंदर मानवी जीवनाचे सार्थक करणे आवश्यक असल्याचे श्री.बडे यांनी नमूद केले. परिचय प्रा.पांडुरंग निळे यांनी करून दिला, प्रास्ताविक विनोद पाचपिल्ले यांनी केले तर सूत्रसंचालन विजय चोरडिया यांनी केले.

पत्रकार अनिल कसबे, बाबुराव चव्हाण यांचा गौरव

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अनिल कसबे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर सामाजिक वार्ता पुरस्कार आणि ज्येष्ठ पत्रकार बाबुराव चव्हाण यांना विकास वार्ता पुरस्काराने, तर नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुडा येथील अपघातात निधन पावलेले माऊली दिगंबर कदम महाराज, प्रसादराव कदम महाराज आणि दत्ता कराळे महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस क्लबचे अध्यक्ष मंचक देशमुख व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष भागवत चव्हाण, आनंद मुरक्या रघुनाथ गडदे आदींसह पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. जिंतूर शहरातील महिला, नागरिक, तरूण, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,820
Please Share
Previous Post

कथाकथन स्पर्धेत साक्षी राठोड, संस्कृती आरसुळे विजेत्या

Next Post

‘ ज्ञानसाधना खेलरत्न ‘ पुरस्काराने खेळाडूंचा गौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
' ज्ञानसाधना खेलरत्न ' पुरस्काराने खेळाडूंचा गौरव

' ज्ञानसाधना खेलरत्न ' पुरस्काराने खेळाडूंचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चार दशकांनी फुलली मैत्रीची शाळा

चार दशकांनी फुलली मैत्रीची शाळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 9, 2026
0

नूतन विद्यालयाच्या १९८६ च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा रंगला सेलू : काळाच्या ओघात प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या झाल्या, आयुष्याच्या धावपळीत संपर्क कमी...

किसान मोर्चाचे १० ऑगस्टरोजी जेलभरो आंदोलन

किसान मोर्चाचे १० ऑगस्टरोजी जेलभरो आंदोलन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
0

एसकेएमचे राष्ट्रपतींना मागण्यांचे पत्र परभणी : संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) आणि केंद्रीय ट्रेड युनियनच्या आवाहनावरून १० ऑगस्ट २०२६ रोजी भारत...

मोकाट कुत्रे व जनावरांचा सुळसुळाट

मोकाट कुत्रे व जनावरांचा सुळसुळाट

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
0

मंगरुळपीर शहरात रस्त्यांवर भीतीचे वातावरण व अपघाताचा धोका; नगरपालिकेकडे तातडीने बंदोबस्त करण्याची निवेदनाद्वारे मागणी मंगरुळपीर (फुलचंद भगत) : शहरातील विविध...

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल  राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 8, 2026
0

१२५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते उद्घाटन सेलू : येथील एल.के.आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ