देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणीत १६ व १७ मार्चला ग्रंथोत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 13, 2026
in परभणी
0
परभणीत १६ व १७ मार्चला ग्रंथोत्सव
Please Share

साहित्यिकांचा सहभाग, ग्रंथदिंडी, कविसंमेलन व पुस्तकांची मोठी प्रदर्शनी

परभणी : शहरातील वसमत रोडवरील जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या परिसरात १६ व १७ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित हा उत्सव जिल्ह्यातील वाचनप्रेमी, विद्यार्थी आणि साहित्य रसिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

ग्रंथोत्सवाचे उद्घाटन १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते होणार असून जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण अध्यक्षस्थानी असतील. त्यापूर्वी सकाळी ८:३० वाजता महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होईल. यावेळी मीनाताई वरपुडकर, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे आणि कथाकार राजेंद्र गहाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या दोन दिवसांत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. १६ मार्च रोजी दुपारी कृत्रिम बुद्धिमत्ता व साहित्य या विषयावर धर्मराज वीर मार्गदर्शन करतील, तर राम निकम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कथाकथन कार्यक्रमात राजेंद्र गहाळ व मिलिंद जाधव सहभाग घेतील. १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्राचार्य रामेश्वर पवार यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक जीवनात ग्रंथालयांचे महत्त्व या विषयावर परिसंवाद होईल. यात अशोक कोलंबीकर, सुभाष ढगे आणि जीवन लोखंडे आपले विचार मांडतील.

ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी २:३० वाजता ज्येष्ठ कवी केशव वसेकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन रंगणार आहे. सायंकाळी ४ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ होईल. या उत्सवात विविध प्रकाशनांच्या पुस्तकांचे स्टॉल लावले जाणार असून वाचनप्रेमींना दर्जेदार पुस्तके खरेदी करण्याची संधी मिळेल. या महोत्सवाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी बाळासाहेब देवणे यांनी केले आहे.

Post Views: 1,748
Please Share
Previous Post

एचपीव्ही लसीकरण : सेलूत तालुका शीघ्र पथकाची बैठक

Next Post

देशाचे भवितव्य कष्टाळू हातांमध्येच

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
देशाचे भवितव्य कष्टाळू हातांमध्येच

देशाचे भवितव्य कष्टाळू हातांमध्येच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ