देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्री साई महोत्सवास उत्साहात सुरुवात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 23, 2026
in परभणी
0
श्री साई महोत्सवास उत्साहात सुरुवात
Please Share

सेलूमध्ये श्रीराम कथा, कीर्तनांसह विविध कार्यक्रमांना प्रतिसाद

सेलू : सेलू येथील ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचे शिष्य श्री साईबाबा यांच्या महेशनगरातील मंदिरात गुढीपाडवा आणि श्रीराम जन्माच्या पावन पर्वावर श्री साई महोत्सवास १९ मार्च, गुरूवारवारपासून उत्साहात सुरुवात झाली. महोत्सवांतर्गत दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित संगीतमय श्रीराम कथेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. भागवताचार्य संजय पिंपळगावकर कथा निरूपण करीत आहेत.

माऊली महाराज वाईकर, मारोती महाराज भिसे, केदार महाराज तांबट आणि अर्जुन कसाब हे सांगीतिक साथ देत आहेत. महोत्सवात सायंकाळी सात आयोजित नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनांनाही श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद आहे. २४ मार्च रोजी गंगाराम महाराज राऊत आणि २५ मार्च रोजी योगेश महाराज गोसावी यांची कीर्तने आहेत. महोत्सवाचा मुख्य सोहळा २६ मार्च रोजी पार पडणार आहे. सकाळी १० वाजता शिवाजी महाराज खवणे यांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा आहे. यावेळी राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. जन्मोत्सवानंतर महाप्रसादाचे (नगरभोजन) आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी श्रीराम व साईबाबांच्या महाआरतीने सांगता होणार आहे. महोत्सवाच्या संयोजनात माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मुकेशराव बोराडे, नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, अशोक मंत्री, प्रभाकर सुरवसे, राजेंद्र झोडगावकर, लक्ष्मण बुरेवार, जनाआबा सोळंके, प्रा ए.डी‌.कुलकर्णी, रवि मुळावेकर, रवि कुलकर्णी, गंगाधर कान्हेकर, प्रतीक बोराडे, बालाजी सरकाळे, सुनील घेवारे, भारत काठवटे आदींसह भाविक पुढाकार घेत आहेत. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

इंधन गुढी’ ठरली लक्षवेधी

गुढीपाडव्यानिमित्त आयोजित ‘सुंदर माझी गुढी’ स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषयावर गुढीसमोर आरस मांडण्यात आली होती. अमेरिका, इस्राएल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधन संकटावरील उपाय दर्शविणार्‍या गुढी समोरील आरस लक्षवेधी ठरली.

रामनवमीनिमित्त नगरभोजनाची परंपरा

श्री राम जन्मोत्सवानिमित्त मागील अनेक वर्षांपासून महाप्रसादाचे (नगर भोजन)आयोजन करण्यात येत आहे. महाप्रसादातील पोळी तयार करण्यामध्ये सर्व सेलूतील महिला, माता भगिनी यांचाही सेवा सहभाग असतो. यावर्षी पोळी साठी पिठाच्या बॅग वाटप करण्यात येत आहे. महिलांनी तयार पोळ्या २६ मार्च रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पर्यंत मंदिरात जमा करून सहभाग नोंदवा. यासाठी साईबाबा मंदिर तसेच ९४२१४८९३४३, ८०८७२०५५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 1,743
Please Share
Previous Post

थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

वीर मातांच्या इतिहासाला नाटिकेद्वारे उजाळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वीर मातांच्या इतिहासाला नाटिकेद्वारे उजाळा

वीर मातांच्या इतिहासाला नाटिकेद्वारे उजाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ