१० एप्रिलरोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन
परभणी : विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार महसूल विभागातील क्षेत्रीय कार्यालयातील पदांच्या आकृतीबंधाचा शासन निर्णय २ एप्रिल २०२६ रोजी निर्गमित झाला आहे. त्यानुषंगाने परभणी जिल्ह्यात सुधारित आकृतीबंधात जिंतूर तालुक्यातील बोरी किंवा चारठाणा येथे अपर तहसील कार्यालय निर्माण करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.
अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याबाबत हरकती सादर करण्याच्या अनुषंगाने १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी ०४.०० वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस जिंतूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तथा प्रशासक ग्रामपंचायत कार्यालय यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले आहे.





