देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मीनाताई बोर्डाकर यांचा मातृगौरव पुरस्काराने सन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 27, 2026
in परभणी
0
मीनाताई बोर्डाकर यांचा मातृगौरव पुरस्काराने सन्मान
Please Share

कै.आण्णासाहेब काकडे संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील ११ मान्यवरांचा गौरव

सेलू : येथील कै. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने मीनाताई रामप्रसाद बोर्डाकर यांचा मान्यवरांच्या हस्ते मातृगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आले. कै. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचे शनिवार २५ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ११ व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

अध्यक्षस्थानी नामदेव महाराज ढवळे होते, तर राजयोगिनी ब्रह्माकुमारी करूणादीदी यांची विशेष उपस्थिती होती. व्यासपीठावर राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, सभापती डॉ. संजय रोडगे, उद्योजक रामप्रसाद घोडके, संस्थेचे अध्यक्ष अशोक काकडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश काटकर, अशोक शेलार, जि. प. सदस्य अजय डासाळकर, डॉ. आशिष डख, संजय साडेगावकर, गजानन डोंबे, प्रा. के. डी. वाघमारे, रामेश्वर राठी, डॉ. सुनील कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आणि यांनी आपल्या मनोगतातून मुलीसुद्धा वंशाचा दिवा असल्याचे सांगितले. आमच्या पाचही बहिणींना आईबाबा मिनाताई व रामप्रसाद बोर्डीकर यांनी मुलांप्रमाणे वाढविले. संस्कार, शिस्त आणि उच्च शिक्षण दिले. मुलगी झाली म्हणून दुःख व्यक्त करू नये, भ्रूणहत्या करू नये. मुलींवर विश्वास ठेवून त्यांना मुलांप्रमाणे वाढविले, त्यांना विकासाची संधी उपलब्ध करून दिली तर दोन्ही घराण्याचे नाव उज्ज्वल करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. ब्रह्माकुमारी करूणादीदी यांनीही भ्रूणहत्या थांबविण्याचे आवाहन केले. मीनाताई बोर्डीकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपला जीवन प्रवास सांगितला आणि सर्वांचे कल्याण आणि सकारात्मक विचार अंगिकारणे गरजेचे आहे, असे नमूद केले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार दिलीप डासाळकर, हभप पंडित महाराज डाके, रमेश महाराज मोरे, गणेश माळवे, डॉ. सुरेश हिवाळे, माधव गव्हाणे, अरुणा थोरे, रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर, प्रा. अनिल कुलकर्णी, डॉ. दिगंबर घोडके यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मातृगौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन बाबासाहेब हेलसकर यांनी केले. प्रास्ताविक अशोक उफाडे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मोहन बोराडे यांनी केले.

Post Views: 1,624
Please Share
Previous Post

विठ्ठल अनमुलवाड यांना ‘ग्लोबल स्टार टीचर अवॉर्ड’

Next Post

सेलूत राज्यस्तरीय लेक्राॅस स्पर्धा आजपासून

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत राज्यस्तरीय लेक्राॅस स्पर्धा आजपासून

सेलूत राज्यस्तरीय लेक्राॅस स्पर्धा आजपासून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ