देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महानंदा पावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षलागवड

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 8, 2026
in परभणी
0
महानंदा पावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षलागवड
Please Share

पावडे कुटुंबियांचा आदर्शवत उपक्रम

हदगाव पावडे/ प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी स्व. महानंदा पावडे यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ हदगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात झाला.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तसेच स्वर्गीय महानंदा पावडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वर्गीय महानंदा पावडे यांच्या अंतिम संस्कारानंतर उरलेली राख पारंपरिक पद्धतीने नदीत विसर्जित न करता, नव्याने लावण्यात आलेल्या वृक्षांच्या मुळाशी अर्पण करण्यात आली. यामुळे वृक्षसंवर्धनाला हातभार लागण्याबरोबरच जलप्रदूषण टाळण्याचा पर्यावरणपूरक संदेशही समाजासमोर ठेवण्यात आला. “जीवनभर माणसांसाठी जगलेल्या आईच्या स्मृती आता वृक्षांच्या रूपाने समाजाला सावली, प्राणवायू आणि पर्यावरण संरक्षणाचे वरदान देतील,” अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.या प्रसंगी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. वृक्ष लागवड व संवर्धनाद्वारे भावी पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण देण्याचा संकल्प करण्यात आला.सदर उपक्रमाचे आयोजन संपूर्ण पावडे परिवाराच्या वतीने करण्यात आले. यामध्ये बाबासाहेब पावडे सर, भगवान पावडे सर, परमेश्वर पावडे, वसंत पावडे, अनंता महाराज पावडे, गणेश पावडे, अभिजीत, आदित्य, आयुष, अस्मिता पतरुंड अनुष्का,शीर्षा, विभू तसेच समाजसेवी व पर्यावरण मित्र रामराव गायकवाड, प्रा.पिंपळगावकर, माधव गव्हाणे, शरद ठाकर, दीपक व मित्र मंडळ यांनी सक्रिय सहभाग घेतला.कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी स्वर्गीय महानंदा पावडे यांच्या स्मृतींना अभिवादन करून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वर्गीय महानंदा पावडे यांच्या स्मृती जपत, हरित भविष्यासाठी एक पाऊल” या संदेशासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post Views: 1,411
Please Share
Previous Post

इबोला विषाणूपासून काळजी घ्यावी

Next Post

शेतकरी मेळावा : सेलूत १० जूनरोजी आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post

शेतकरी मेळावा : सेलूत १० जूनरोजी आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ