देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत साकारतेय प्रिन्स इन्फोटेंटमेंट पार्क

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
in परभणी
0
सेलूत साकारतेय प्रिन्स इन्फोटेंटमेंट पार्क
Please Share

मराठवाड्यातील पहिले विज्ञान-पर्यटन केंद्र; शिक्षण आणि मनोरंजनाचा अद्वितीय संगम

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या वतीने सॅनरो नॉलेज सिटी, रवळगाव रोड, सेलू येथे PRINCE Infotainment Park हा बहुकोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात असून, हा प्रकल्प मराठवाड्यातील विद्यार्थी, पालक आणि पर्यटकांसाठी शिक्षण व मनोरंजनाचे नवे पर्व ठरणार आहे. Ultimate Destination for Learning & Fun या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प सन २०२६ च्या उत्तरार्धात नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. ही माहिती सोमवारी, १५ जून २०२६ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेले हे इन्फोटेंटमेंट पार्क विज्ञान, क्रीडा, निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडविणारे मराठवाड्यातील पहिले विज्ञान-पर्यटन केंद्र ठरणार आहे. या पार्कमध्ये Curiosity SIAC (Science Innovation & Activity Centre), ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, किड्स स्विमिंग पूल, बहुउद्देशीय क्रीडा संकुल, अटल टिंकरिंग लॅब, IgniteX स्किल लॅब, खुल्या वातावरणातील विज्ञान उद्यान, बोटॅनिकल गार्डन आणि बहुउद्देशीय सभागृह अशा विविध आकर्षणांचा समावेश असणार आहे.विशेष म्हणजे, Curiosity SIAC हे महाराष्ट्रातील सातवे विज्ञान केंद्र ठरणार असून त्यास राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग (RGSTC), नेहरू सायन्स सेंटर, मुंबई तसेच होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांचे सहकार्य लाभले आहे.

या केंद्रात व्हर्च्युअल अॅनाटॉमी लॅब, स्पेस व्हॉयेज सिम्युलेटर, व्हीआर केमिस्ट्री लॅब, ऑगमेंटेड रिअॅलिटी लॅब, होलोग्राम थिएटर, रोबोटिक्स व कोडिंग लॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, परभणी जिल्ह्यातील पहिला ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव आणि अत्याधुनिक क्रीडा सुविधा या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, क्रीडा आणि नवोपक्रम यांचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

याबाबत बोलताना श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे म्हणाले की, भौगोलिक मर्यादा गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या आड येऊ नयेत, ही आमची भूमिका आहे. PRINCE Infotainment Park च्या माध्यमातून सेलू हे महाराष्ट्रातील विज्ञान-पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून उदयास येईल. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आता विज्ञान केंद्रांचा अनुभव घेण्यासाठी पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. सुमारे १०,००० हून अधिक वार्षिक पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाचा लाभ परभणीसह नांदेड, लातूर आणि आसपासच्या पाच जिल्ह्यांतील ५०० हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांना होणार आहे. PRINCE Infotainment Park हा केवळ एक प्रकल्प नसून, ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, नवोपक्रम आणि मनोरंजनाच्या नव्या संधी निर्माण करणारा ऐतिहासिक उपक्रम ठरणार आहे.

Post Views: 1,819
Please Share
Previous Post

सेलूत खत विक्री केंद्रांवर विशेष पथके; तीन केंद्रांना नोटिसा

Next Post

भक्तीमार्गानेच माणसाचे परमकल्याण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
भक्तीमार्गानेच माणसाचे परमकल्याण

भक्तीमार्गानेच माणसाचे परमकल्याण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ