देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

भक्तीमार्गानेच माणसाचे परमकल्याण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
in परभणी
0
भक्तीमार्गानेच माणसाचे परमकल्याण
Please Share

श्रीमद् भागवत कथेत पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, श्री सोनामाय प्रतिष्ठानचा उपक्रम

सेलू : माणसाला दैनंदिन जीवनात पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीमद् भागवतात आहेत. भागवत हे सर्व सांसारिक लोकांकरिता आहे. भक्ती ही मोह, शोक मुक्तीचे माध्यम आहे. आजच्या युगात भक्तीसारखा दुसरा योग्य मार्ग नाही. भक्तीमार्गानेच माणसाचे परमकल्याण होते. सर्व प्रकारचे आचार, कर्म भगवंताला अर्पण करणे म्हणजे भक्ती. भक्तीने मन स्वच्छ, प्रसन्न होते, असे प्रतिपादन पद्मनाभ महाराज व्यास (धाराशिव) यांनी केले.

कुलकर्णी परिवाराच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त श्री सोनामाय प्रतिष्ठान आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे दुसरे पुष्प पद्मनाभ महाराज व्यास यांनी रविवारी शहरातील भक्तितीर्थ साई मंदिरात गुंफले.पुढे बोलताना पद्मनाभ महाराज व्यास म्हणाले की, श्रोता हा विवेकवान असला तरच वक्ता जबाबदारीने अभ्यासपूर्वक बोलतो. चांगल्या गोष्टी ग्रहण करणारा श्रोता असावा. वाईट गोष्टी बाहेर टाकून चांगल्या गोष्टी स्वीकारायला हव्यात. टीव्ही आणि मोबाईल हा सर्व कर्माचा नाश करतो, त्यामुळे सामाजिक माध्यमांचा वापर विवेकीपणे करावा. आळसाचा त्याग करावा. आपल्या पारंपरिक कार्यक्रमात इव्हेंटपेक्षा योग्य विधी, संस्काराला महत्त्व दिले तरच फलप्राप्ती होते, असेही ते म्हणाले. कथेच्या प्रारंभी इशिता अतुल कुलकर्णी हिने अभंग गायन केले.

सूत्रसंचालन अनिल रत्नपारखी यांनी केले. श्रीमद् भागवत कथेस मिलिंद जोशी, सतीश कुलकर्णी, विठ्ठल पडघन, प्रदीप साळेगावकर, रत्नाकर सावरगावकर, महेश खारकर, डी. व्ही. मुळे, प्रदीप सोन्नेकर, विशाल काला, कोलते, दीपक भरड आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,490
Please Share
Previous Post

सेलूत साकारतेय प्रिन्स इन्फोटेंटमेंट पार्क

Next Post

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ