परभणी : हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी पहाटे भूकंपाचे एकापाठोपाठ चार धक्के नोंदविण्यात आले. सदर भूकंपाचे धक्के परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्येही सौम्य स्वरूपात जाणवल्याबाबत नागरिकांकडून जिल्हा प्रशासनास दूरध्वनीद्वारे माहिती प्राप्त झाली आहे. सध्याच्या घडीला परभणी जिल्ह्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. तथापि, जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरु नये, शांतता राखावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा
परभणी, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण...





