देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

एसआयआर प्रशिक्षणाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 17, 2026
in परभणी
0
एसआयआर प्रशिक्षणाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Please Share

राष्ट्रीय कार्यात सहभागाचे आवाहन

परभणी, दि. १६ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत कै. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनांच्या (NSS) विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत एसआयआर मोहिमेत बीएपलओंना सहकार्य करण्याचा संकल्प केला.

हा प्रशिक्षण कार्यक्रम उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अरुणा संगेवार व उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, नोडल अधिकारी प्रा. गणेश शिंदे यांच्या नियोजनातून आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे होते. यावेळी एसआयआर पथकातील अरविंद शहाणे, मोहन आल्हाट, प्रफुल्ल शहाणे, त्र्यंबक वडसकर, रामप्रसाद अवचार आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. भिसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, देशसेवा करण्यासाठी मोठ्या संधींचीच गरज नसते. छोट्या-छोट्या कृतींमधूनही राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान देता येते. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

यानंतर एसआयआर पथकातील अरविंद शहाणे, मोहन आल्हाट आणि प्रफुल्ल शहाणे यांनी एसआयआर प्रक्रियेची, गणना फॉर्मची तसेच बीएलओंना आवश्यक असलेल्या सहकार्याची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील बीएलओंना मदत करून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी एसआयआर मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन बीएलओंना सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. रवींद्र इंगळे, प्रा. डॉ. ओमप्रभा लोकरे, प्रा. डॉ. संगीता आवचार, प्रा. डॉ. पल्लवी कुलकर्णी, प्रा. डॉ. संगीता लोमटे, प्रा. आशा गिरी, प्रा. अश्विनी चाणमारे, प्रा. माधुरी देशमुख, प्रा. निकिता कुलकर्णी, प्रा. कांचन शर्मा, प्रा. कौसर बेगम आदींनी परिश्रम घेतले.


Post Views: 1,562
Please Share
Previous Post

कै.सौ.वत्सलाबाई राके स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Next Post

कालिदास महाराज यांचे अपघाती निधन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कालिदास महाराज यांचे अपघाती निधन

कालिदास महाराज यांचे अपघाती निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ