देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

कालिदास महाराज यांचे अपघाती निधन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 17, 2026
in परभणी
0
कालिदास महाराज यांचे अपघाती निधन
Please Share

दत्त संप्रदाय, शिष्य परिवारावर शोककळा; श्रीक्षेत्र गुंज येथे होणार अंत्यसंस्कार

परभणी : शिवाश्रम, गुंज, ता. पाथरी जि. परभणी येथील परमपूज्य कालिदास महाराज बोरीकर यांचे शुक्रवार, १७ जुलै २०३६ रोजी सकाळी अपघातात दुर्दैवी निधन झाले. गुजरात मधील गरुडेश्वर येथील एक धार्मिक कार्यक्रम आटोपून महाराज छत्रपती संभाजीनगर येथे येत होते. धुळे-सोलापूर महामार्गावर निपाणी फाट्याजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती कळताच महाराजांचा शिष्यपरिवार धावून आला. शहरातील एका खाजगी रुग्णालयात महाराजांना दाखल करण्यात आले परंतु काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यावेळी महाराजांसमवेत त्यांच्या लहान भावाची पत्नी स्मिता हणमंतराव बोरीकर रा. सातारा या देखील होत्या. त्यांचेही या अपघातात निधन झाले. महाराजांच्या दुसऱ्या लहान भावाचे जावई सेलूचे आशुतोष डुघरेकर हे देखील या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील संस्कार उद्या शनिवारी, १८ जुलै रोजी सकाळी गुंज येथे होणार आहेत. महाराजांचा केवळ मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात व इतर राज्यात देखील खूप मोठा शिष्य परिवार आहे. परमपूज्य कालिदास महाराज हे ब्रह्मचारी व मौनी होते. केवळ दत्त गुरूंच्या आराधनेची पंचपदी वगळता ते कायम मौनात असत. कालिदास महाराजांच्या निधनामुळे सर्वदूर पसरलेल्या त्यांच्या शिष्य परिवारावर शोककळा पसरली आहे.

दत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार

परमपूज्य कालिदास महाराज यांनी मागची ४० वर्षे मौनव्रत स्वीकारून महाराष्ट्रभर दत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. हजारो लोकांना भक्तिमार्गाला लावून समाज सत्कार्यी लागावा, निर्व्यसनी व्हावा यासाठी त्यांनी अविरतपणे काम केलं. अध्यात्म, तपश्चर्या आणि सेवाभावासाठी ते ओळखले जात होते. त्यांनी सुमारे ४० वर्षे अखंड मौनव्रत पाळल्यामुळे त्यांची विशेष ख्याती होती. मौन असूनही ते भाविकांना आशीर्वाद देत आणि अनेक जण त्यांना संतस्वरूप मानत. साधेपणा, संयम, ईश्वरभक्ती आणि लोककल्याण यांचा संदेश त्यांनी आपल्या जीवनातून दिला. त्यांच्या निधनामुळे भक्तपरिवारात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. मौनातून अध्यात्माचा संदेश देणारे परमपूज्य कालिदास महाराज यांचे तपस्वी जीवन, त्याग, साधना आणि आध्यात्मिक प्रेरणा भाविकांच्या स्मरणात सदैव राहतील.

Post Views: 1,138
Please Share
Previous Post

एसआयआर प्रशिक्षणाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

रेल्वे प्रशासनाने योग्य समन्वयातून मार्ग काढावा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
रेल्वे प्रशासनाने योग्य समन्वयातून मार्ग काढावा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

रेल्वे प्रशासनाने योग्य समन्वयातून मार्ग काढावा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

परभणी, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण...

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर कलेचे सादरीकरण, दोन फेऱ्यांमध्ये आयोजन, परभणीत २ ऑगस्ट रोजी महोत्सव परभणी : ‘इतिहास महाराष्ट्राचा...

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

विदर्भ, खानदेश आणि कोकणाला हवामान विभागाचा इशारा मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा...

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

दलित आघाडीचे अमित भालेराव यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश परभणी, दि.२८ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ