देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
in महाराष्ट्र
0
जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास
Please Share

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या वादातून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रज्ञा एस. काळे यांनी प्रत्येकी पाच-पाच वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून या रकमेपैकी ४० हजार रुपये यातील जखमी समाधान वाघमारे यास देण्याचे आदेश दिले आहेत.

मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देपूळ गावात दि. १२ फेब्रुवारी २०२२ रोजी आरोपी मोसीन शहा मन्सूर शहा आणि मन्सूर शहा गुलाब शहा यांनी लक्ष्मीबाई तुळशीराम वाघमारे हिचा नातू समाधान शालिकराम वाघमारे यांना जुन्या वादातून कुऱ्हाड व सूरीने गंभीर वार करून जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आसेगाव पोलीस ठाण्यात चार आरोपी विरुद्ध भादंवि च्या कलम ३०७,३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला.

याप्रकरणी मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रज्ञा एस. काळे यांच्या न्यायालयात यामध्ये सुनावणी झाली. यामध्ये एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. चार आरोपींपैकी दोन आरोपीतांविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश प्रज्ञा एस. काळे यांनी पाच -पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. सबळ पुराव्याअभावी शागिराबी मन्सूर शहा आणि सलमाबी ऊर्फ माया अख्तर शहा यांची निर्दोष मुक्तता केली. तसेच नुकसान भरपाई म्हणून जखमी समाधान शालिकराम वाघमारे यांना दंडाची रक्कम ४० हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात सरकारच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एस. के. गिमेकर यांनी शासनाची बाजू प्रभावीपणे मांडली. पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. खंदारे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. महिला पोलीस कॉन्स्टेबल (एलपीसी) परविन भुरीवाले यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

Post Views: 1,434
Please Share
Previous Post

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

Next Post

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ