पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
सेलू : नगर परिषदेच्या वतीने एक कोटी रुपये विकास निधीतून शहरातील समतानगरमध्ये उभारण्यात आलेल्या नमो उद्यानाचे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते शनिवारी, ५ सप्टेंबर २०२६ रोजी दिमाखदार लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मिलिंद सावंत होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, मुख्याधिकारी महेश गायकवाड, बांधकाम सभापती मनीष कदम, दिनकर वाघ, पप्पू डोंबे, डॉ.आशिष डख, सदस्य दीपक कोल्हाळ, शांताबाई ठाकूर, रामेश्वर काजळे, गणेश सवणे, उरुजलाला, सुबोध काकडे, भाऊसाहेब सोनवणे, बाळासाहेब झमकडे, शेख रहीम, भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या देववन मियावाकी घनवन प्रकल्पाला पालकमंत्री बोर्डीकर यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच मोकाट श्वान निर्बीजीकरण एबीसी सेंटर व निवारा केंद्र याचेही उद्घाटन केले. प्रास्ताविक नगराध्यक्ष मिलिंद सावंत, सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले, तर मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी आभार मानले. याप्रसंगी श्री राम मंदिर समितीच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नमो उद्यानाच्या कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री मेघना साकोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नागरिकांची मोठी उपस्थिती होती.





