“श्री भैरवनाथांची गुफा ” पाहण्यासाठी सेलूकरांची गर्दी
सेलू जि.परभणी : सेलू येथील मोंढा भागातील श्री आदर्श व्यापारी गणेश मंडळाने गणेशोत्सवाची ६१ वर्षाची परंपरा जपली आहे. या वर्षी मंडळातर्फे “श्री भैरवनाथांची गुफा ” हा भव्य हलता देखावा साकारण्यात आला आहे. देखावा पाहाण्यासाठी सेलूकरांनी गर्दी केली आहे. १९६४ साली या मंडळाची स्थापना झाली. स्व.कमल लोया, स्व.इलेश पटेल, स्व.अमरितसिंग बब्बर आदींसह व्यापाऱ्यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक, पौराणिक सजीव देखाव्यांव्दारे मनोरंजन आणि लोकप्रबोधनाची चळवळ मंडळाने सुरू केली. ज्वलंत सामाजिक विषयावर प्रबोधन, उपक्रम, स्पर्धांचे आयोजन केले जाते. अध्यक्ष चंद्रप्रकाश सांगतानी, प्रभुदयाल मंत्री, प्रथमेश राठी, आनंद मालाणी, संजय परताणी, रामवल्लभ राठी, अशोक मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी “श्री भैरवनाथांची गुफा” या देखाव्याव्दारे भूतांविषयीची सामाजिक अंधश्रद्धा दूर करणे यावर भर दिल्याचे प्रथमेश राठी यांनी सांगितले. सायंकाळी सहा ते दहा या वेळेत देखावा सर्वांसाठी खुला आहे. गणेशभक्त व रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
मंडळाच्या विविध उपक्रमांत प्रथमेश राठी, अनुप कबरा, भागवत पाटील, सुनील सोमाणी, शीतल गंगवाल, धीरज मंत्री, वरुण भुतडा, विनीत मालानी, कृष्णा बहिवाल, अभिजित बोराडे, पंकज परदेशी, हर्षल पाटील, वंश गुरबानी, शैलेश भराडीया, नीलेश घोरी, जयंत गोरे, नारायण शर्मा, महेश काबरा, प्रतीक बोराडे, राजदीप रोडगे, पुनीत गुरबानी, वरद जाजु, आरुष राठी, अर्पण मंत्री, माधवेश भुतडा, अमेय मंत्री, सगीर भाई (मंडपवाले), ऋषी डांगे (ऑफसेट), भीमा पेंटर आदी परिश्रम घेत आहेत. मंडळाच्या कार्यात सध्या तिसरी पिढी आहे. विविध कार्यक्रमांत माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, प्रभाकर सुरवसे, राजेंद्र झोडगावकर तसेच सर्व व्यापारी मंडळाचे सहकार्य लाभते, असे बाळूशेठ मंत्री यांनी सांगितले.





